रायगड: शिक्षकासह तरुणाला सहल जीवावर बेतली, अकोल्यातील दोघांचा पाण्यात बु़डून अंत
Raigad News : शिक्षकासह एक विद्यार्थी सहलीला गेले असताना दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे दोघेही अकोल्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मन हेलावून टाकणारी घटना 8 नोव्हेंबर रोजी शनिवारी सायंकाळी घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रायगडच्या काशीद बीच परिसरात काय घडलं?
शिक्षक राम कुटेंचा दुर्देवी मृत्यू
Raigad News : शिक्षकासह एक विद्यार्थी सहलीला गेले असताना दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे दोघेही अकोल्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मन हेलावून टाकणारी घटना 8 नोव्हेंबर रोजी शनिवारी सायंकाळी घडली आहे. अकोल्यातील शुअरवीन क्लासेसमधील 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक सहलीसाठी काशीद बीचवर गेले होते. मात्र, समुद्रात पोहताना अचानकपणे आलेल्या लाटेत शिक्षक आणि विद्यार्थी पाण्यात बुडाल्याची मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हे ही वाचा : “गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन” सरकारची नवी योजना', पार्थ पवार जमीन घोटाळ्यानंतर रोहित पवार पहिल्यांदा बोलले
रायगडच्या काशीद बीच परिसरात काय घडलं?
शिक्षकाचे नाव राम कुटे (वय 60) असे आहे. तसेच दुसरीकडे विद्यार्थी आयुष रामटेके (वय 19) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास हा मरुड पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील एका खासगी शिकवणी क्लासेसची सहल रायगड जिल्ह्यातील काशीद बीच परिसरात फिरण्यासाठी गेली होती.
शिक्षक राम कुटेंचा दुर्देवी मृत्यू
या सहलीत विद्यार्थ्यांसह शिक्षकही होते. सायंकाळच्या सुमारास साडेपाच वाजता सुमारास समुद्रकाठी उतरले असता, समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या घटनेत शिक्षक राम कुटेंचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
हे ही वाचा : नागपूर हादरलं, आईने काकासोबत पळून जाऊन लग्न केलं, मुलाच्या जिव्हारी लागलं, चुलत्याला क्रूरपणे संपवलं










