“गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन” सरकारची नवी योजना', पार्थ पवार जमीन घोटाळ्यानंतर रोहित पवार पहिल्यांदा बोलले
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी जमीन प्रकरण निवळल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत महायुतीने केलेल्या जमीन घोटाळ्याचा पाढा वाचला आहे. त्यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पार्थ पवार जमीन घोटाळ्यानंतर रोहित पवार पहिल्यांदा बोलले
रोहित पवारांचं ट्विट चर्चेत
'x' ट्विटमध्ये अजित पवार गट असाच उल्लेख
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार जमीन घोटाळ्याने चर्चेत आला आहे. कोरेगाव पार्क येथील महार वतानाच्या 40 एकर जमीन घोटाळ्यावरून सध्या तपास सुरु आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी जमीन प्रकरण निवळल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत महायुतीने केलेल्या जमीन घोटाळ्याचा पाढा वाचला आहे. पोस्टमध्ये त्यांनी अजित पवार गट असाच उल्लेख केल्याचं दिसून येत आहे.
हे ही वाचा : नांदेड हादरलं! 6 वर्षीय चिमुरडी शिकवणीहून घरी जाताना 22 वर्षीय नराधमाने केले लैंगिक अत्याचार, नागरिकांकडून फाशीची मागणी
त्यांनी आपल्या ट्विटमधून 'हे सर्व घोटाळे बघता शिवसेना शिंदे गट , भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून कायदे - नियमांना धाब्यावर बसवून जमिनी लाटणारी “गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन” अशी नवी योजना सरकारमार्फत सुरू केलीय असेच म्हणावे लागेल. “करून वोटचोरी- करू जमिनीची लुटमारी” असे नवे ब्रीदवाक्य सरकारने ठेवायला हरकत नाही,' असं 'X' ट्विट त्यांनी केलं आहे.
रोहित पवारांचं ट्विट जसंच्या तसं....
“गुन्हेगारांना जामीन - नेत्यांना जमीन” सरकारची नवी योजना
नवी मुंबईत शिंदे साहेबांचा गट – 5000 कोटीची सिडको जमीन










