एअर इंडियाचं विमान नव्हे तर आगीचा गोळा, अपघाताचे हादरवून टाकणारे Videos

अहमदाबाद एअरपोर्टजवळीळ एअर इंडिया विमानाच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतंय? पाहा...

एअर इंडिया विमान अपघाताचे हादरवून टाकणारे Videos

एअर इंडिया विमान अपघाताचे हादरवून टाकणारे Videos

मुंबई तक

12 Jun 2025 (अपडेटेड: 12 Jun 2025, 04:13 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अहमदाबाद एअरपोर्टजवळ एअर इंडिया विमानाचा मोठा अपघात

point

Air India विमान क्रॅशचा नवा व्हिडीओ

point

Air India विमान अपघाताचे व्हिडीओज

Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद एअरपोर्टजवळ एअर इंडिया विमानाचा मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे आंतरराष्ट्रीय विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं. या भीषण अपघातानंतर सर्वत्र काळा धूरच दिसत होता आणि आता बचावकार्यासाठी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

हे वाचलं का?

अपघाताचा व्हिडीओ आला समोर 

या धक्कादायक विमान अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये विमान आकाशात उडल्यानंतर काही सेकंदात जमिनीवर कोसळताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान जवळपास 400 फूट उंचीवरून कोसळताना दिसत आहे. विमान जमिनीवर पडताच त्याचं आगीच्या गोळ्यात रुपांतर होऊन मोठा स्फोट झाल्याचं दिसत आहे. यानंतर रेस्क्यूचे व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत. या व्हिडीओंमध्ये सर्व काही राख आणि ढिगाराच दिसून येत आहे. 

मेघानी नगर या रहिवासी भागात विमान कोसळलं आणि यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही आग लागली आहे. एअरपोर्टपासून मेघानी नगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी अनेक रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात एकूण 242 लोक होते. यामध्ये दोन पायलट, 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवाशांचा समावेश आहे. गुरुवारी दुपारी 1:38 वाजता विमानाने उड्डाण केले आणि अवघ्या दोन मिनिटांत दुपारी 1:40 वाजता ते जमिनीवर कोसळले. अहमदाबाद पोलिस नियंत्रण कक्षानेच याची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानी नगरजवळ ते कोसळले.

हे ही वाचा: Ahmedabad Plane Crash: अपघात झालेल्या Air India विमानात होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी!

विमान क्रॅशचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मेघानी नगर परिसरातील धारपूर येथून प्रचंड धुराचे लोट दिसत आहेत. घटनास्थळी आपत्कालीन पथक तैनात करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण निश्चित केलेले नाही. अपघातग्रस्त विमान बोईंगचं 787 ड्रीमलायनर असल्याचे सांगितले जात आहे 11 वर्षे जुने होते.

सध्या अहमदाबाद प्रशासन आणि अग्निशमन विभागाने बचाव कार्य सुरू केले आहे, जेणेकरून मोठं नुकसान टाळता येईल.

हे ही वाचा: मोठी बातमी: 242 प्रवाशांना घेऊन जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं, अहमदाबाद विमानतळाजवळ भीषण अपघात

अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादला जात आहेत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपघाताची माहिती दिली आहे. याव्यतिरिक्त मिळालेल्या माहितीनुसार, विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश नागरिक, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होते. याशिवाय, विमानात दोन पायलटसह 12 क्रू मेंबर्स होते.

    follow whatsapp