सोलापूर : बेघर महिलेने 3 वर्षांच्या बाळाला गोव्यात नेऊन विकले, आता DNA टेस्ट होणार, रक्ताचे नमुनेही घेतले

Solapur News : तिची ओळख पटल्यावर गोवा पोलिसांनी मुलासोबतचा तिचा संबंध तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित महिलेनं तो मुलगा आपल्या ताब्यात नसल्याचा दावा केला.

Solapur News

Solapur News

मुंबई तक

07 Dec 2025 (अपडेटेड: 07 Dec 2025, 12:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूर : बेघर महिलेने 3 वर्षांच्या बाळाला गोव्यात नेऊन विकले

point

आता DNA टेस्ट होणार, रक्ताचे नमुनेही घेतले

Solapur News : गोवा पोलिसांनी तीन वर्षांच्या लहान मुलाला विक्रीसाठी नेल्याच्या संशयावरून सोलापुरातील एका बेघर महिलेची चौकशी केली आहे. मुलाच्या ओळखीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे महिलेची डीएनए चाचणी करण्यात येत असून, पुढील तपासाचे दिशानिर्देशन याच निकालावर अवलंबून राहणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

हे वाचलं का?

ही कारवाई काणकोण पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या प्रकरणानंतर सुरू झाली. गोव्यात एका अज्ञात महिलेच्या ताब्यात तीन वर्षांचा मुलगा आढळला होता. त्याच्या संगोपनाबाबत कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलिसांनी विचारपूस केली असता त्या चिमुरड्याने आपण पूर्वी सोलापुरात राहत असल्याचे सांगितले. यानंतर तपासाचा धागा सोलापूरकडे वळला.

हेही वाचा : Personal Finance: RBI च्या रेपो दर कपातीमुळे म्युच्युअल फंडमध्ये प्रचंड मोठी संधी, कोणत्या फंड मिळेल जबरदस्त परतावा?

मुलाशी संबंधित माहिती गोळा करताना पोलिसांना कळाले की, हा मुलगा ज्या महिलेसोबत होता, ती सोलापूरमध्ये दिसल्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांचे पथक शुक्रवारी सोलापुरात दाखल झाले. स्थानिक पोलीस हवालदार अभिजित वामने यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. काही तासांच्या शोधानंतर दत्त चौक परिसरात ती महिला आढळून आली.

तिची ओळख पटल्यावर गोवा पोलिसांनी मुलासोबतचा तिचा संबंध तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित महिलेनं तो मुलगा आपल्या ताब्यात नसल्याचा दावा केला. त्यामुळे सत्यता जाणून घेण्यासाठी पोलिसांनी डीएनए परीक्षणाची प्रक्रिया त्वरित राबवली. शनिवारी महिलेचे रक्तनमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले.

डीएनए अहवाल आल्यानंतर मुलाचा त्या महिलेशी काही संबंध आहे का, हे स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. गोवा पोलिसांनी नमुने गोळा केल्यानंतर परतीचा प्रवास सुरू केला असून, अहवाल प्राप्त होईपर्यंत दोन्ही राज्यातील पोलिस यंत्रणा या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.

ही संपूर्ण घटना मुलांचे अवैध संगोपन, मानव तस्करी आणि बेघर व्यक्तींचा गैरवापर यांसारख्या गंभीर मुद्द्यांना पुन्हा एकदा उजाळा देणारी ठरत आहे. तपासणीची प्रक्रिया सुरू असून, सत्य लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

लातूर: कॅफेत नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार! जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेचालकांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल...

    follow whatsapp