लातूर: कॅफेत नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार! जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेचालकांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल...
लातूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. पीडितेवर अत्याचार करण्यासाठी आरोपीला दोन कॅफेचालकांनी जागा उपलब्ध करून दिली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फूस लावून कॅफेत नेलं अन् अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेचालकांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल...
Latur Crime: लातूर जिल्ह्यातून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीसह दोन कॅफेचालकांना सुद्धा अटक केली असल्याची माहिती आहे. संबंधित कॅफेचालकांनी आरोपीवर मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता, अटक झालेल्या आरोपींची चौकशी करून पुढील तपास केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित घटना ही 4 डिसेंबर रोजी उघडकीस आली.
पीडितेला फूस लावून पळवून नेलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांच्या तपासादरम्यान, रिहान गुलाब शेख (18) नावाच्या एका तरुणाने पीडितेला फूस लावून पळवून नेल्याचं समोर आलं. त्यानंतर, तिच्यावर आरोपीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले.
हे ही वाचा: दिरासाठी मुलगी पाहायला निघालेल्या वहिनीचा रस्त्यातच गेला जीव, असं घडलं तरी काय?
पीडितेवर कॅफेत लैंगिक अत्याचार
तसेच, मुलीवर अत्याचार करण्यासाठी तिला शहरातील कॅफे डेली ग्राइंड आणि एस. पी. कॅफे डेअर याठिकाणी नेण्यात आलं निष्पन्न झालं. ही माहिती समोर येताच पोलिसांनी सूरज राजेश ढगे आणि अनिकेत अजय कोटुळे या कॅफेचालकांना ताब्यात घेतलं. या दोघांवर सुद्धा पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा: Personal Finance: RBI च्या रेपो दर कपातीमुळे म्युच्युअल फंडमध्ये प्रचंड मोठी संधी, कोणत्या फंड मिळेल जबरदस्त परतावा?
पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
प्रकरणातील मुख्य आरोपी रिहान शेख याला पोलिसांनी 4 डिसेंबर रोजी अटक केली असून त्याच्यासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली. तसेच, या घटनेतील इतर दोन आरोपी असलेल्या कॅफेचालकांना 5 डिसेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून न्यायालयाकडून 8 डिसेंबरपर्यंत पीसीआर मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तसेच आरोपींना कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्या कॅफे, लॉज किंवा हॉटेल मालकांवर पोक्सो अॅक्टअंतर्गत करवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आहे.










