भिवंडीत 10 वर्षीय चिमुकलीकडून 58 वर्षीय वृद्धावर अत्याचार केल्याचा आरोप, परिसरात संतापाची लाट

Thane crime : ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 10 वर्षीय चिमुकलीवर एका 58 वर्षीय वृद्ध पुरुषाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रसंगी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरण समजून घेऊन परिसरात संतापाची लाट उसळली.

Thane crime

Thane crime

मुंबई तक

• 07:30 PM • 24 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

58 वर्षीय आरोपीकडून पीडितेवर घृणास्पदपणे कृत्य

point

आरोपीवर पोक्सो अंतर्गत कारवाई 

Thane Crime : ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 10 वर्षीय चिमुकलीवर एका 58 वर्षीय वृद्ध पुरुषाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रसंगी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरण समजून घेऊन परिसरात संतापाची लाट उसळली आणि चिंतेचे वातावरण पसरलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : '8 महिलांचे 35 व्हिडिओ, अशोक खरातने भोंदूगिरी करून महिलांवर केले बलात्कार', फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं

हा केवळ गुन्हा नसून, समाजाची काळी बाजू समोर आल्याचं समजतंय. या घटनेनं पीडितेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून, आरोपीच्या भूमिकेची कसून चौकशी केली जात आहे. ही संपूर्ण घटना ठाणे जिल्ह्यातील भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीत घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

58 वर्षीय आरोपीकडून पीडितेवर घृणास्पदपणे कृत्य

पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, आरोपीने मुलीला काहीतरी बहाणा करून आपल्या घरी बोलावले आणि तिथेच तिच्यावर घृणास्पदपणे कृत्य केल्याची माहिती आहे. संबंधित घटना ही डिसेंबर 2025 ते  फेब्रुवारी 2026 दरम्यान भिवंडीच्या निझामपुरा भागातील आरोपीच्या घडली घडली. 58 वर्षीय आरोपीने मुलीला घरी बोलावून तिच्याशी अश्लील कृत्य केल्याची माहिती आहे. यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर बनते. आरोपी आणि पीडित यांच्याच ओळख असल्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा संशय आहे. 

हे ही वाचा : 'नेता दोषी आढळून आल्यास त्याची कसलीही गय केली जाणार नाही,' देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना मोठा इशारा

आरोपीवर पोक्सो अंतर्गत कारवाई 

संबंधित प्रकरणात कुटुंबीयांनी हिंमत दाखवत पोलिसांकडे धाव घेतली. कुटुंबीयांच्या आधारे, पोलिसांनी रविवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. भारतीय दंड संहितेच्या कलम 64 आणि 74, तसेच लैंगिक पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली.