Maharashtra Weather : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये 12 जानेवारी रोजी हवामानात विविधता जाणवण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (IMD) वातावरणात लक्षणीय बदल होत आहेत. अशातच राज्यातील एकूण हवामान कसं असेल याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'जर मुंबईला जिंकवायचं असेल आणि दिल्लीसमोर ताठ मानेनं... तर तुम्ही कोणाला मतदान कराल?', आदित्य ठाकरेंनी एका दमात गाजवली सभा
कोकण :
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. याच जिल्ह्यातील हवामान हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मुंबईत किमान तापमान 18-20 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान हे 30-32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. त्याचप्रमाणे काही ठिकाणी उबदार वातावरणाची शक्यता आहे. तसेच रात्री आणि सकाळी थंडावा जावण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात सकाळी दाट धुक्यासह दाट धुके राहतील. तसेच दुपारच्या सुमारास सूर्यप्रकाश उबदार राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी हलक्या थंडीच्या लाटेचा प्रवाह जाणवेल. तर सातारा आणि सोलापुरात काही प्रमाणात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात हवामान विभागाने पहाटे धुक्यांची चादर पसरेल असा अंदाज वर्तवला. तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा शक्यता असेल असं अंदाज असल्याचं सांगितलं.
हे ही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे’ आजही मोठा ब्रँड? मुंबईतील लोकांना काय वाटतं? C Voter च्या सर्व्हेमध्ये नेमकं काय?
विदर्भ :
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात राज्यात सर्वाधिक थंडी राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी 6-7 अंशापर्यंत घसरण होण्याची शक्यता. तसेच सकाळी धुके आणि दुपारी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तसेच थंडीच्या लाटेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











