अमरावतीत रस्त्यात श्वान आडवं आलं, अस्थी विसर्जनासाठी चाललेला ट्रक उलटला, 20 जणांपैकी 17...

Amravati news : अमरावतीच्या पुसदा-शिराळा येथून अस्थी विसर्जनासाठी श्री क्षेत्र सालबर्डी येथे जाणाऱ्या नागरिकांची मिनी ट्रक मोर्शी-पाळा मार्गावर उलटला होता. ही घटना 9 नोव्हेंबर रोजी  रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली आहे.

Accident News

Accident News

मुंबई तक

• 04:27 PM • 10 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अमरावतीत श्वान आडवं आलं आणि अस्थी विसर्जनासाठी जाणारा ट्रक उलटला 

point

17 अपघातग्रस्त रुग्णालयात दाखल

point

अपघातग्रस्तांची नावे आली समोर 

Amravati News : अमरावतीच्या पुसदा-शिराळा येथून अस्थी विसर्जनासाठी श्री क्षेत्र सालबर्डी येथे जाणाऱ्या नागरिकांची मिनी ट्रक मोर्शी-पाळा मार्गावर उलटला होता. ही घटना 9 नोव्हेंबर रोजी  रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणात तब्बल 20 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यापैकी इतर तिघेजण गंभीररीत्या जखमी आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पत्नीचं बाहेर लफडं सुरु असल्याचा पतीला संशय, क्रिकेटच्या बॅटनेच केला प्राणघातक हल्ला, महिलेला जागेवरच केलं ठार

श्वान आडवं आलं आणि अस्थी विसर्जनासाठी जाणारा ट्रक उलटला 

या अपघातातील 17 जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. अपघातामागील कारण आता समोर आलं आहे. रस्त्यावर आडवा आलेल्या श्वानामुळे हा गंभीर अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात पुसदा येथील रहिवासी असलेले 30 ते 40 नागरिक एमएच 14 एझेड 5239 मिनीट्ररमधून अस्थी विसर्जनासाठी श्री क्षेत्र सालबर्डी येथे जात होते. मोर्शी-पाळा मार्गावर जात असताना भररस्त्यातच श्वान आडवं आल्याने चालक सलमान याकूब खानने श्वानास वाचवण्यासाठी वाहन वळवले. पण, नंतर वाहनाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. 

17 अपघातग्रस्त रुग्णालयात दाखल

संबंधित अपघाताची माहिती मिळताच, मोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने या अपघातात जखमी झालेल्यांना मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. प्राथमिक उपचारासाठी एकूण 17 अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रक चालक सलमान याकूब खान याला आयसीयुत दाखल करण्यात आले आहे. 

हे ही वाचा : सुप्रिया सुळेंची राजकीय प्रगल्भताच काढली, अंबादास दानवेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

अपघातग्रस्तांची नावे आली समोर 

 

दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची नावे आता समोर आली आहेत. अपघातात जखमींमध्ये दिवाकर राऊत, सुनील खंडरे, राहुल राऊत, दिलीप धानोरकर, महेश राऊत, प्रथमेश राऊत, प्रथमेश राऊत, विजय राऊत, सलमान खान याकुब खान, निलेश कवरे, संतोष राऊत, अनिकेत राऊत, नरेंद्र गजबे, पंकज राऊत, सचिन राऊत, रामराव राऊत, दिलीप नेवारे हे दुखापतग्रस्त आहेत. 

    follow whatsapp