भरधाव हायवा ट्रक आला आणि फुटपाथवरच्या वाहनांना चिरडत निघाला, चंद्रपुरात पुण्यासारखीच घटना...

पोलिसांनी हायवा चालकाला ताब्यात घेतलं असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, चालकाला मिर्गीचा झटका आल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटलं. 

Mumbai Tak

मुंबई तक

03 Jun 2025 (अपडेटेड: 03 Jun 2025, 08:57 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

चंद्रपूरमध्ये भरधाव ट्रकने फुटपाथावरील वाहनांना चिरडलं

point

पोलीस भरती करणाऱ्या तरूणीला चिरडलं

Chandrapur : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. अनियंत्रित झालेल्या वाहनांमुळे निरपराध लोकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनांची मालिकाच सुरू आहे. पुण्यातली घटना ताजीच असताना चंद्रपुरातही एक घटना घडली. चंद्रपूर शहरातील तुकुम-ताडोबा रोडवर सोमवारी संध्याकाळी एक भीषण अपघात घडला. एक नियंत्रण सुटलेला हायवा ट्रक फुटपाथवर चढला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांसह डझनभर वाहनांना चिरडलं. या भीषण अपघातात 22 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> सृष्टी WhatsApp वर पाठवायची मुलींचे 'ते' फोटो, 'तो' घाणेरडा खेळ सुरू करणारी महिला अन्...

 

फुटपाथवरच्या वाहनांना चिरडत निघाला ट्रक...

पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी याबद्दलची माहिती दिली. हायवा ट्रकच्या चालकाला अचानक मिर्गीचा झटका आला. त्यानंतर वाहन अनियंत्रित झालं. यामुळे वेगात असलेला ट्रक थेट गजबजलेल्या फुटपाथवर चढला. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी, तीनचाकी रिक्षांसह अनेक वाहनांना चिरडलं. 

मृत तरुणीची ओळख पटली असून, ती लक्कडकोट येथील रहिवासी सानिका कुमरे आहे. ती पोलीस भरतीची तयारी करत होती. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा >> Video : बैल नाही तो..वाघ आहे वाघ! भारतीय टूरिस्टवर Tiger ने केला खतरनाक हल्ला..'ती' चूक नडली

पोलिसांनी हायवा चालकाला ताब्यात घेतलं असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, चालकाला मिर्गीचा झटका आल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटलं. 

दरम्यान, या अपघाताने तुकुम-ताडोबा रोडवरील सायंकाळच्या वेळी होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आलाय. पोलिसांनी चालकाला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

    follow whatsapp