शुक्राणू दान करून बनला 67 पोरांचा बाप, पण एक चूक अन्...

मुंबई तक

29 May 2025 (अपडेटेड: 29 May 2025, 06:03 PM)

Sperm Donor Viral News : यूरोपमध्ये धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका स्पर्म डोनरचं जीन दुर्मिळ आणि खतरनाक TP53 असल्याचं समोर आलंय.

Sperm Donor Viral News

Sperm Donor Viral News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

स्पर्म डोनरमुळे दहा मुलांना कोणता भयानक आजार झाला?

point

त्या व्यक्तीच्या स्पर्मचा वापर करून 67 मुलांचा जन्म झाला

point

नेमकं घडलं तरी काय? जाणून घ्या सविस्तर माहिती

Sperm Donor Viral News : यूरोपमध्ये धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका स्पर्म डोनरचं जीन दुर्मिळ आणि खतरनाक TP53 असल्याचं समोर आलंय. या व्यक्तीच्या स्पर्मचा वापर करून 67 मुलांना जन्म देण्यात आला. यापैकी 10 मुलांना कर्करोग झाला आहे. या प्रकरणामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्पर्म डोनेट करणाऱ्यांची योग्य तपासणी होते की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

हे वाचलं का?

युरोपमध्ये स्पर्म डोनेट करण्याचं धक्कादायक प्रकरण

यूरोपमध्ये नुकतच एका व्यक्तीने खतरनाक जीन म्यूटेशन TP53 ने स्पर्ट डोनेट केलं. TP53 मुळे कर्करोग होऊ शकतो. 2008 पासून 2015 पर्यंत या डोनरच्या स्पर्मने आठ यूरोपीय देशांमध्ये कमीत कमी 67 मुलांना जन्म दिला आहे. यापैकी 10 मुलांना ल्यूकेमिया आणि नॉन-हॉजकिन लिंफोमासारखा कर्करोग झाला आहे. 23 मुलांमध्ये जीन म्युटेशन आढळलं आहे. जे ली फ्रामेनी सिंड्रोम नावाच्या आजाराशी जोडला गेला आहे. यामुळे अनेक प्रकारचे धोकादायक कर्करोग होऊ शकतात.

हे ही वाचा >> कोयत्याचे 17 वार, सूर्यकांतने तडफडत जीव सोडला, बाप-लेकानं कुणाचंच ऐकलं नाही, वाद नेमका काय?

जेव्हा स्पर्म डोनेट केलं गेलं होतं, तेव्हा जीनच्या माध्यमातून खतरनाक म्यूटेशनबाबत समजलं नव्हतं. कारण त्यावेळी हे जीन आणि कर्करोगाचं कनेक्शन समजलं नव्हतं. स्पर्म बँकने प्रत्येक डोनरकडून 75 कुटुंबांना दान करण्याचं लिमिट ठेवलं होतं. पण या स्पर्म डोनरच्या माध्यमातून किती मुलं जन्माला आली, याचं सत्य समोर आलं नाही.

या प्रकरणानंतर डॉक्टर आणि एक्सपर्ट सांगतात की, स्पर्म डोनेट करण्याबाबत कडक नियम असले पाहिजेत. प्रत्येक डोनरकडून किती मुलांना जन्म दिला पाहिजे, याचा निश्चित आकडा ठरवला पाहिजे. जेनेटिक टेस्टिंगही चांगली आणि सुरक्षित असली पाहिजे. जर एखाद्या डोनरमध्ये खतरनाक जीन म्यूटेशन असेल, तर कुटुंबियांना तशा सूचना दिल्या पाहिजेत. 

हे ही वाचा >> मामाच्या मुलावर प्रेम पण कुटुंबाचा विरोध, 16 वर्षाच्या मुलीने थेट... ठाण्यातील धक्कादायक घटना