Viral News: आतापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये डीएनए चाचणीमुळे अनेक रहस्य उघडकीस आले आहेत. पण आता याच चाचणीमुळे हे अशी कहाणी समोर आली आहे की, ज्यामुळे तुमचंही डोकं चक्रावून जाईल. एका महिलेने तिच्या पतीसह केलेल्या DNA चाचणीमुळे त्यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं आहे. या सगळ्या गोष्टीचा अनुभव महिलेने सोशल मीडियावरून जगासमोर मांडला आहे. त्यांनी केलेली डीएनए चाचणी खूपच आश्चर्यकारक ठरली आहे, कारण नवरा आणि बायको असा दोघांचाही एकाच व्यक्तीपासून जन्म झाल्याचं समोर आलं आहे. म्हणजे सून ज्या व्यक्तीला सासरा समजत होती तो खरं तर तिचा आणि तिच्या पतीचाही बाप असल्याचं उघडकीस झालं. हे सर्व ऐकून सुनेच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सुरेश रैना आणि शिखर धवनला ईडीचा मोठा दणका, 11 कोटींची संपत्ती जप्त, नेमकं प्रकरण काय?
नेमकं काय घडलं?
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील एका महिलेच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. सोशल मीडियावर रेडिटवर तिची कहाणी शेअर करताना, पोस्टमध्ये तिने लिहिलं की, मला ठाऊक होते की माझा जन्म हा एका स्पर्म डोनर व्यक्तीकडून झाला आहे. म्हणजे तिच्या ज्या व्यक्तीपासून जन्म झाला आहे तो एक स्पर्म डोनर आहे. दरम्यान, महिलेने आपल्या पतीसोबत मिळून मस्करीत AncestryDNA टेस्ट केली. ज्यामागे तिचा विचार असा होता की, तिला एखादा लांबचा भाऊ किंवा बहीण सापडेल.
पण जेव्हा टेस्ट रिपोर्ट आला तेव्हा महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती DNA टेस्ट 99% ही तिच्या पतीसोबतच जुळत होती. म्हणजेच आतापर्यंत ज्या व्यक्तीला ती आपला पती समजत होती तो खरं तर तिचा 'हाफ-सिबलिंग' म्हणजेच चक्क सावत्र भाऊ निघाला.
महिलेचा सासरा हे प्रत्यक्षात शुक्राणू दाता
सुरुवातीला जोडप्याला वाटलं की, चाचणीमध्ये काही तरी गफलत झाली असावी.. त्यामुळे जोडप्याने पुन्हा एकदा डीएनए चाचणी करून पाहिली. पण दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीमध्येही तेच कटू सत्य समोर आलं. खरं तर महिलेचा सासरा हा एक स्पर्म डोनर होता. त्याने जे स्पर्म डोनेट केलं होतं त्यातूनच महिलेचा जन्म झाला होता. पण आपण स्पर्म डोनर आहोत ही गोष्ट त्याने आपल्या कुटुंबापासून लपवून ठेवली होती.
हे ही वाचा: 'तेरे आदमी आए तो बताना करण आया था...' उल्हासनगरमध्ये गुंडाची दहशत, टपरीवाल्यावर चाकूने हल्ला
दरम्यान, या डीएनए टेस्टने हे स्पष्ट केलं की, जे पती-पत्नी आहेत त्या दोघांचे बायोलॉजिकल वडील ही एकच व्यक्ती आहे. म्हणजे ते एकाच डोनरची मुलं आहेत. लग्नाला अनेक वर्ष झालेले असताना आणि या दाम्पत्याला दोन मुलं असताना आता त्यांच्यासमोर जे सत्य आलं आहे त्याने ते हादरून गेले आहेत.
रेडिटवर आपल्या भावना व्यक्त करताना त्या महिलेनं लिहिलं की, 'मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते. पण मला आता काय करावे हेच कळत नाही. एका खऱ्या गोष्टीने आमच्यातील आनंद एका झटक्यात निघून गेला आहे.' दरम्यान, तिची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT











