'तेरे आदमी आए तो बताना करण आया था...' उल्हासनगरमध्ये गुंडाची दहशत, टपरीवाल्यावर चाकूने हल्ला
Ulhasnagar crime : उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका हल्लेखोराने एका टपरीचालकावर चाकूने जोराचा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा हल्ले संबंधित टपरीचालकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने केल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नेमकं काय घडलं?
'तेरे लडके आये तो उनको बोल देना...'
पान टपरीवाल्यावर चाकूने हल्ला केला आणि...
Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका हल्लेखोराने एका टपरीचालकावर चाकूने जोराचा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा हल्ले संबंधित टपरीचालकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने केल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.
हे ही वाचा : 'त्या' एका कारणावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत तोडलं, हादरून टाकणारी घटना, पोलिसंही चक्रावले
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गुंडाचे नाव करण लबाना असे आहे. तो गुरु तेज बहादूर कॉलनीतील रहिवासी आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी या प्रकरणात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीने पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन दिले आहे.
संबंधित प्रकरणात पान टपरीवर हल्ला करण्यात आला त्यांचं नाव पन्नास जयस्वाल असे आहे. त्यांची नानक जीरा चौक येथे कनक जनरल स्टोअर नावाने पान टपरीचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पन्नालाल हे दुकानात असताना कारण नामक तरुण दुकानात आला. त्याने चॉकलेटची बरणी पन्नालाल यांच्या दिशेने फेकून मारली. त्यानंतर दुकानात शिरत खिशातून चाकू काढत पन्नालालवर हल्ला केला.
हे ही वाचा : पत्नीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर, बॉयफ्रेंडला हाताशी धरून केला खून, मृतदेह किचन वट्याखाली पुरला, त्याच घरात तिच्याशी...
'तेरे लडके आये तो उनको बोल देना...'
तेव्हा चिढलेल्या करणने लाथा बुक्क्यांनी पन्नालाल यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर तिथून जाताना 'तेरे लडके आये तो उनको बोल देना करण आया था मे उसका मर्डर कर दुंगा' असे म्हणून धमकावत निघून गेला. या प्रकरणी नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










