'त्या' एका कारणावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत तोडलं, हादरून टाकणारी घटना, पोलिसंही चक्रावले
crime news : घरगुती वादातून एक पतीने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली आहे. जेवणावरून पती पत्नीत इतके वाद झाले की त्यात हत्या झाली. या घटनेनं गावात आणि परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नेमकं काय घडलं?
पतीला दारू पुरवल्याचे पत्नीचे आरोप
Crime News : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील खाखरेरू पोलीस ठाणे परिसरात बुधवारी एक दु:खद घटना घडली आहे. घरगुती वादातून एक पतीने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली आहे. जेवणावरून पती पत्नीत इतके वाद झाले की त्यात हत्या झाली. या घटनेनं गावात आणि परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.
हे ही वाचा : रितेश भाऊच्या सिनेमात भाईजानची एंट्री, 'राजा शिवाजी' सिनेमात सलमान खान साकारणार 'ही' ऐतिहासिक भूमिका
नेमकं काय घडलं?
खाखेरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सानवापर ख्वाजीपूर गावात बुधवारी घडलेल्या हत्येनुसार, राम नारायण पाल आणि त्यांची पत्नी लल्ली देवी (वय 60) यांचा जेवणावरून शेजाऱ्यांशी वादंग निर्माण झाला. लल्ली देवी तिच्या पतीसाठी ट्यूबवेलवर जेवण करत होते, परंतु त्याने शेजाऱ्याच्या घरी जेवायला नकार दिला आणि म्हटले की, तो घरी आहे. अशातच दोघांमध्ये वाद झाला. घरी परतत असताना, रामनारायण पालने कुऱ्हाडीने त्याच्या पत्नीवर वारंवार हल्ला केला. अशातच तिचा जागीच मृत्यू झाल्याची ही घटना आहे.
पतीला दारू पुरवल्याचे आरोप
तिच्या आई आणि वडिलांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शेजारच्यांच्या घरी जेवणावरून वाद झाला. लल्ली देवी यांनी शेजाऱ्यांना विचारले की, 'तुमच्या मुळे आमच्या घरात वाद होत आहेत. पण तिचा पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यावर वाद घालण्यास सुरुवात केली. शिवाय, आरोपी पतीला दारू पुरवल्याचे आरोपही आहेत.
हे ही वाचा : मुलीचा साखरपुडा थाटात का केला? अखेर इंदुरीकर महाराजांचे स्पष्टीकरण; म्हणाले, 'बऱ्याच लोकांची तक्रार..'
संबंधित घटनेची महिती मिळताच, पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास केला आहे. मृताच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून, हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणात पथकांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. तसेच घटनास्थळाचा तपास करत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदन तपासणी सुरु करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी पतीला अटक केआली आणि तक्रारीवरून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे आणि आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










