मुलीचा साखरपुडा थाटात का केला? अखेर इंदुरीकर महाराजांचे स्पष्टीकरण; म्हणाले, 'बऱ्याच लोकांची तक्रार..'

मुंबई तक

Indurikar Maharaj explanation on daughter engagement ceremony controversy : लोकांना साधेपणा लग्न करा म्हणाले, पण मुलीचा साखरपुडा थाटात का केला? इंदुरीकर महाराजांचे स्पष्टीकरण

ADVERTISEMENT

Indurikar Maharaj explanation on daughter engagement ceremony controversy
Indurikar Maharaj explanation on daughter engagement ceremony controversy
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकांना साधेपणा लग्न करा म्हणालो, पण मुलीचा साखरपुडा थाटात का केला?

point

अखेर इंदुरीकर महाराजांचे स्पष्टीकरण

Indurikar Maharaj daughter engagement ceremony controversy : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांच्या कन्येचा साखरपुडा नुकताच संगमनेर येथे पार पडला. इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह चि. साहिल चिलाप यांच्याशी होणार आहेत. ते मूळचे पुण्यातील असून नवी मुंबईत व्यवसाय करतात. दरम्यान, कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या कीर्तनात नेहमी लोकांना साध्या पद्धतीने विवाह करा, असे उपदेश दिले होते. मात्र, त्यांनी त्यांच्या कन्येचा साखरपुडा थाटात पार पडला. त्यामुळे नेटकऱ्यांसह महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. मात्र इंदुरीकर महाराजांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा : मोठी बातमी : तहसिलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन, पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई

इंदुरीकर महाराज स्पष्टीकरण देताना काय म्हणाले? 

इंदुरीकर महाराज म्हणाले, माझ्याकडे लोकांची तक्रार आली. लोकं म्हणाले, इंदुरीकर महाराज कंबर बांधू-बांधू सांगतात लग्न साध्या पद्धतीने करा. पण त्यांनी एवढा मोठा बडेजाव का केला? तर हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की, आपण बदल करु शकतो. आपल्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे. आपण जेवण महाराष्ट्रीयन ठेवलं होतं. आपल्याकडे चायनीज चालणार नाही. वाढणाऱ्याचा ड्रेस वारकरी होता. कोणाचा सत्कार नाही. सगळ्यांना समान वागणूक होती. खुर्ची देखील कोणाला नाही. सर्वजण खाली बसले. जे आजारी आहेत, त्यांनीच खुर्चीवर बसायचं. ज्यांना खुब्याचा आणि मणक्याचा आजार आहे, त्यांनी खुर्चीवर बसायचं. वारकरी संप्रदायाने जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलं. वारकरी संप्रदायाने कोणाची निंदा केली नाही. कोणाच जास्त कौतुक केलं नाही. आपण वैष्णव आहोत, आपल्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे.

पुढे बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले, गाय वासरासाठी दुध देते. परंतु तिच्या दुधाचा उपयोग सर्वांना होतो. तसं मी तुमचं लेकरु म्हणून सर्वांचे गुणगाण गाण्यापेक्षा तुम्ही उपस्थित राहिलात याबद्दल आभार मानतो. यापेक्षा आपण काही बोलू शकत नाही. आपण या कार्यक्रमात बदल केलाय. प्रत्येक कार्यक्रमात विशिष्ट लोकांना फेटे बांधणे आणि विशिष्ट लोकांनी त्याच्याकडे पाहाणे. असं आपण केलं नाही. विशिष्ट लोकांचा सत्कार करायचा नाही. केला तर सर्वांचाच करायचा. नाहीतर एकाचाही नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp