रितेश भाऊच्या सिनेमात भाईजानची एंट्री, 'राजा शिवाजी' सिनेमात सलमान खान साकारणार 'ही' ऐतिहासिक भूमिका
salman khan in raja shivaji movie : सलमान खान रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या मराठी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साथीदाराची महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यामुळे या सिनेमाच्या चर्चेस आतापासूनच सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राजा शिवाजी सिनेमात सलमान खान साकारणार भूमिका
संजय दत्तचंही नाव चर्चेत
Salmain Khan In Raja Shivaji Movie : अभिनेता रितेश देशमुख आणि बॉलिवूडचा दंबग खान म्हणजे सलमान खान यांचं एक वेगळंच नातं आहे. नुकत्याच आलेल्या 'वेड' या मराठी सिनेमात सलमान खान रितेशच्या सांगण्यावरून 'मला वेड लावलंय' या गाण्यावर थिरकला होता. आता सलमान खान रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या मराठी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साथीदाराची महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यामुळे या सिनेमाच्या चर्चेस आतापासूनच सुरुवात झाली आहे.
हे ही वाचा : आमदार संग्राम जगताप यांनी जैन ट्रस्टच्या जागेवर ऑफिस बांधलं का? मंगुबाई व्होरा यांनी मृत्यूपत्रात काय लिहिलं होतं?
सलमान खान कोणाची भूमिका साकारणार?
सलमानचे काही सिनेमे आपटल्याचे चित्र दिसून आले. सिकंदरमधून त्याला मोठी अपेक्षा होती पण, तो सिनेमाही चालला नाही. अशातच आता रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट म्हणून 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमाकडे पाहिले जाईल यात मात्र शंका नाही. माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, सलमान 'राजा शिवाजी' या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे साथीदार जीवा महाले यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
संजय दत्त कोणती भूमिका साकारणार?
तर दुसरीकडे अफजलखानाच्या भूमिकेमध्ये बॉलिवूडचा अभिनेता संजू बाब अर्थातच संजय दत्त दिसणार आहे. यामुळे आता या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, सलमान खान आणि रितेश देशमुख यांची घट्ट मैत्री असल्याची अनेक उदाहरणं आहेत. मग ते वेड सिनेमातील वेड लावलं हे गाणं असो की, राजा शिवाजी या चित्रपटात जीवा महाले यांची केलेली भूमिका हेच त्या दोघांच्या मैत्रीचं प्रतिक असल्याचे अनेकदा दिसून येते.
हे ही वाचा : कोरेगाव पार्क जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अडचणी वाढणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे आदेश
सलमान आणि संजय दत्त या दोघांची नावे या सिनेमाला जोडली गेल्याने हा सिनेमा चांगल्या उंचीवर नेण्यास सोपं होईल असं बोललं जातंय. तसेच दोघांच्या शुटिंगच्या तारख्या ठरलेल्या असल्याचं बोललं जातंय. सलमानच्या सिनेमातील एंट्रीमुळे चाहत्यांच्या मनात चित्रपटाती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.










