आमदार संग्राम जगताप यांनी जैन ट्रस्टच्या जागेवर ऑफिस बांधलं का? मंगुबाई व्होरा यांनी मृत्यूपत्रात काय लिहिलं होतं?
MLA Sangram Jagtap and Jain Trust land : आमदार संग्राम जगताप यांनी जैन ट्रस्टच्या जागेवर ऑफिस बांधलं का? मंगुबाई व्होरा यांनी मृत्यूपत्रात काय लिहिलं होतं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आमदार संग्राम जगताप यांनी जैन ट्रस्टच्या जागेवर ऑफिस बांधलं का?
मंगुबाई व्होरा यांनी मृत्यूपत्रात काय लिहिलं होतं?
MLA Sangram Jagtap and Jain Trust land, आहिल्यानगर : अहिल्यानगर येथील जैन समाजाच्या श्री ऋषभ संभव जैन श्वेतांबर संघ ट्रस्टच्या मालकीची जागा बळकावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप करत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे शहरप्रमुख किरण काळे यांनी केला. या ट्रस्टच्या जागेवर जगताप यांनी गेल्या वर्षभरापासून राष्ट्रवादीचे कार्यालय उभारले आहे. काही ट्रस्टींच्या मदतीने ही जागा विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असून, यासाठी एका वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध करून विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असंही किरण काळे यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणात आम्ही सर्व पुरावे जोडून धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्या अर्जात या जागेची बेकायदेशीर विक्री तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली असून, प्रकरणाची सखोल चौकशी करून ट्रस्टचे अध्यक्ष आणि ट्रस्टी यांना नोटीस बजावावी, त्यांचा खुलासा मागवावा आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काळे यांनी केली.
जैन ट्रस्टचे अध्यक्ष या प्रकरणावर काय म्हणाले?
दरम्यान, या प्रकरणावर जैन ट्रस्टचे अध्यक्ष याबाबत बोलताना म्हणाले, आम्ही कोणतीही जागा विकण्याचा प्रयत्न केलेला नाही. संबंधित जागेत राहात असलेला भाडेकरु जागा सोडण्यासाठी करण्यासाठी तयार नव्हता. ट्रस्टची जागा पडून आहे, तिचं करायचं काय? त्यामुळे आम्ही ती जागा विकण्याचा निर्णय घेतला. कारण आम्हाला हा वाद नको आहे. मात्र, ही जागा कोणी घ्यायला तयार नव्हतं. कारण मृत्यपत्रात ही जागा विकता येणार नाही, असं नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे नंतर आम्ही जागा विकण्याचा निर्णय मागे घेतला.
ट्रस्टला जागा दान करणाऱ्या मंगुबाई व्होरा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात काय लिहिलं होतं?
माझे वय 72 झाले असून आत्तापर्यंत मला कोणताही आजार नाही. मी सर्वत्र फिरु शकते, सध्या कामधंदा करत आहे. तथापि , माझ्या देहाचा भरोसा नाही. कोणत्या वेळेस काय होईल हे सांगता येता नाही. त्यामुळे मी हे मृत्यूपत्र करत आहे. माझ्या पश्चात माझ्याकडील जी संपत्ती आहे. कोणाकडे जावी याचा संपूर्ण तपशील मी देत आहे. यामध्ये त्यांनी स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबत वर्णन केलं होतं. त्यांनी ट्रस्टच्या नावे 101 रुपये देणगी म्हणून पाठवावी. माझ्याकडे लाकडी सामान, भांडीकुंडी, कपाट वगैरे आहे, त्याची देखील विल्हेवाट देखील ट्रेस्टने लावावी. स्थावर मालमत्तेत भाडेकरु राहात आहेत, मला ते मासिक भाडे देत आहेत. मी जिवंत आहे, तपोर्यंत हे मी स्वत: वसूल करेन. त्याचा कर देखील मीच देईन. माझ्या मृत्यूनंतर या जागेचे सर्व अधिकार ऋषभ श्वेतांभर ट्रस्टकडे राहतील. त्याच्यावर ट्रस्टचा मालकी हक्क असेल. माझ्यानंतर त्यांनी या जागेची काळजी घ्यावी. या जागेचे उपभोग जैन धार्मिक कार्यासाठी करावा. या जागेवरुन मधुबन नावाने कोनशिला बसवावी. श्रीमंत मंगुबाई हिरालाल वोहरा यांनी स्वर्गिय माधवलाल मेहता यांच्या स्मरनार्थ केली आहे, अशी कोनशिला बसवावी. माझी जागा देणगी म्हणून देण्यात आली, असा उल्लेख करावा. ही जागा इतर कोणासही देऊ नये. या जागेचा वापर केवळ धार्मिक कामासाठी करावा.










