Virat Kohli at Preamanand Maharaj Ashram : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली यानं कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर देशभर चर्चा सुरूय. विराटचे चाहते नाराज झाले असून, त्याच्यासाठीही हा निर्णय सोपा नव्हता असं दिसतंय. दुसऱ्या दिवशी लगेचंच पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावनमध्ये असलेल्या प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं. मंगळवारी सकाळी विराट आणि अनुष्का वृंदावनात पोहोचले होते. यावेळी त्यांचा प्रेमानंद महाराजांशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे.
ADVERTISEMENT
प्रेमानंद महाराजांनी काय कानमंत्र दिला?
प्रेमानंद महाराजांनी विराट आणि अनुष्का यांना सांगितलं की, "वैभव मिळणं ही ईश्वराची कृपा नसून ते पुण्य आहे. तुम्ही पाहिलं असेल की, चुकीची कामं करणाऱ्यांनाही वैभव मिळतं. पण हे त्यांच्या मागच्या जन्माचं पुण्य असतं. त्यामुळे वैभव किंवा यश याला कृपा समजू नये. खरी कृपा तेव्हा होते, जेव्हा अंतर्मनाचा विचार बदलतो."
हे ही वाचा >> ऑनलाईन चाकू मागवला, स्वत:ला संपवलं! चिठ्ठीमध्ये शिक्षणमंत्र्यांकडे काय मागणी केली?
प्रेमानंदजी महाराजांनी पुढे सांगितलं की, ईश्वर जेव्हा कृपा करतो, तेव्हा तो संतांचा सहवास आणि जीवनात प्रतिकूलता देतो. जर तुमच्या आयुष्यात प्रतिकूलता दिसली, तर समजून जा की ईश्वराची कृपा होतेय. जेव्हा एखादं काम तुमच्या मनाप्रमाणे होत नाही आणि तुम्हाला कष्ट करावे लागतात, थोडा त्रास सहन करावा लागतो. तेव्हा असं समजा की, ईश्वर तुमच्यावर कृपा करतोय. त्यामुळे तुम्ही फक्त ईश्वराचं नामस्मरण करत राहा," असा सल्ला प्रेमानंद महाराजांनी दिला आहे.
विराट-अनुष्का तिसऱ्यांदा प्रेमानंद महाराजांच्या चरणी
प्रेमानंद महाराजांनी विराट आणि अनुष्का यांच्याशी 15 मिनिटं संवाद साधला. मात्र, विराट आणि अनुष्का या आश्रमात जवळपास दोन तास होते. विशेष म्हणजे, प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाची त्यांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2023 मध्ये आणि यावर्षी जानेवारीतही त्यांनी वृंदावनाला भेट दिली होती. दरम्यान, विराट आणि अनुष्का यांच्या या भेटीने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
हे ही वाचा >> सोलापूरच्या पठ्ठ्याला प्रत्येक विषयात 35 पैकी 35! लेकाच्या दहावीच्या निकालानंतर बापाने थेट...
विराटचा कसोटी क्रिकेटमधील प्रवास
विराट कोहलीनं सोमवारी इंस्टाग्रामवर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. कोहलीचं 14 वर्षांचं कसोटी क्रिकेटमधलं हे करीअर अत्यंत विराट राहिलं आहे. त्याने 123 कसोटी सामन्यांच्या 210 डावांमध्ये 30 शतकांसह 9230 धावा केल्या. 36 वर्षीय विराट शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळला होता, तिथे भारताला 1-3 अशी मालिका गमवावी लागली.
ADVERTISEMENT
