NEET परीक्षेत 720 पैकी 710 मार्क मिळाले, बीडच्या मुलाने पुण्यात चाकूने गळा चिरून का संपवलं स्वत:ला?
11 मे रोजी रात्री विद्यार्थ्यांची डीजे नाईट पार पडली, तेव्हा उत्कर्षने भरपूर एन्जॉय केला. मात्र, दुसऱ्या दिवशी 12 तारखेच्या पहाटेच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यात MBBS च्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

बाथरूममध्ये गळा चिरून घेतला, रक्चाच्या थारोळ्यात मृतदेह

सुसाईडनोटमध्ये नेमकं काय लिहिलं?
Pune Crime News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक चक्रावून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात विद्यार्थ्यांशी संबंधीत घडणाऱ्या घटना पालकांमध्ये चिंता निर्माण करणाऱ्या ठरत आहेत.अशातच बीडमधील एका 20 वर्षाच्या विद्यार्थ्यानं पुण्यात आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. दोन दिवसांपूर्वी 12 मे रोजी ही घटना घडली.
हे ही वाचा >> सोलापूरच्या पठ्ठ्याला प्रत्येक विषयात 35 पैकी 35! लेकाच्या दहावीच्या निकालानंतर बापाने थेट...
उत्कर्ष महादेव शिंगणे हा विद्यार्थी भोपाळमध्ये एम्स कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत होता. हा विद्यार्थी मुळ बीड जिल्ह्याचा रहिवासी होता. उत्कर्ष हा आंतरमाहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांसाठी पुण्यात आलेला होता. पुण्यात 8 मे पासून या स्पर्धा सुरू होत्या. यामध्ये उत्कर्ष सहभागी झाला होता. पुण्यात असतानाच त्यानं हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
ऑनलाईन मागवला होता चाकू
11 मे रोजी रात्री विद्यार्थ्यांची डीजे नाईट पार पडली, तेव्हा उत्कर्षने भरपूर एन्जॉय केला. मात्र, दुसऱ्या दिवशी 12 तारखेच्या पहाटेच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. उत्कर्षने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन चाकू मागवला होता. याच चाकूने त्याने स्वत:ला गळा चिरून स्वत:ला संपवलं. वसतिगृहाच्या बाथरूममध्ये त्याचा मृतदेह अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. वानवडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची दखलत घेतली.
शिक्षण मंत्र्यांकडे काय मागणी केली?
उत्कर्षने संपूर्ण घटनेचं कारण आपल्या पालकांना सुसाईड नोटच्या माध्यमातून कळवलं. त्यानं पालकांना ऑनलाईन ही नोट पाठवली होती. धक्कादायक म्हणजे त्याने स्टेटसला सुसाईड नोट टाकत त्यात काही मागण्याही केल्या होत्या. मुघल, फ्रेंच आणि रशियन लोकांचा इतिहास आपल्या अभ्यासक्रमातून काढून टाका आणि त्याऐवजी छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप यांचा अभ्यासक्रमात समावेश करा अशी मागणी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
हे ही वाचा >> गजा मारणेला पोलिसांकडूनच VIP ट्रीटमेंट? पोलिसांच्या गाडीतच दिली बिर्याणी, व्हिडीओ समोर आल्यावर...
उत्कर्ष हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. त्यामुळे तो अभ्यासाचा आणि शैक्षणिक गोष्टींचा ताण घ्यायचा आणि त्याच तणावातून त्यानं हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्याच्यावर उपचारही सुरू होते अशी माहिती आहे. विशेष म्हणजे, त्याला अतिशय कठीण मानल्या जाणाऱ्या नीट वरीक्षेत तब्बल 720 पैकी 710 मार्क पडले होते. मात्र, तरीही त्यानं अभ्यासाचं काय टेन्शन घेतलं असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.