सोलापूरच्या पठ्ठ्याला प्रत्येक विषयात 35 पैकी 35! लेकाच्या दहावीच्या निकालानंतर बापाने थेट...
राज्यात अनेक विद्यार्थ्यांना 90 पेक्षा अधिक टक्के मिळाले, काहींना तर 100 टक्के सुद्धा मिळालेत. पण त्यांना झाला नसेल इतका आनंद 35 टक्के मिळवणाऱ्या शिवमला झालाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल काल जाहीर

सोलापूरच्या पठ्ठ्याची राज्यभर होतेय चर्चा
Maharashtra State Board Exam Result : महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल काल जाहीर झाला. लाखो विद्यार्थी आणि पालकांनी यानंतर जल्लोष साजला केला. तर कमी मार्क मिळाल्यानं काहीजण नाराज झाले. मात्र, सोलापुरातल्या एका पठ्ठ्याची खास चर्चा होतेय.
दहावीच्या निकालात 90 किंवा त्यापेक्षा अधिक टक्के घेतलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जातंय. परंतु सोलापुरात एका पठ्ठ्याने चांगलीच कमाल केलीय, सगळ्या विषयात सारखेच म्हणजेच 35 मार्क मिळवण्याची किमया शिवम वाघमारे या विद्यार्थ्यानं करून दाखवली आहे.
हे ही वाचा >> गजा मारणेला पोलिसांकडूनच VIP ट्रीटमेंट? पोलिसांच्या गाडीतच दिली बिर्याणी, व्हिडीओ समोर आल्यावर...
सिद्धेश्वर बालक मंदिर शाळेचा विद्यार्थी असलेल्या शिवमने दहावीत 35 टक्के मिळवलेत. सगळ्याच विषयात 35-35 मार्क मिळाल्याने सोलापुरात त्याचं कौतुक केलं जातंय. कमी टक्के मिळाल्याचा राग न मानता कुटुंबियांनी शिवमची मिरवणुक काढून गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केलाय. वाघमारे कुटुंबाने संपूर्ण परिसरात पेढे वाटले आणि शिवमला हार घालून त्याच्या निकालाचं जोरदार सेलीब्रेशन केलंय.
कमी मार्क मिळाले की पालक नाराज होतात, मुलांवर ओरडतात, परंतु केवळ 35 टक्के मिळवणाऱ्या शिवमच्या वडिलांनी तसं केलं नाही. त्यांच्यासमोर निकाल आल्यानंतर त्यांनी जल्लोष केला. गावभर पेढे वाटले, गुलाल उधळत मिरवणूक काढली आणि शिवमच्या गळ्यात हार घालून त्याचं स्वागत केलं. शिवमचे वडील म्हणाले, तो अभ्यासच करत नव्हता. पास होईल की नाही, याचीही खात्री नव्हती, मात्र तो पास झाला त्यामुळे आम्हाला आनंद झाला.
हे ही वाचा >> ज्या सोफिया कुरैशींचं देशभर कौतुक होतंय, त्यांना भाजप मंत्री म्हणाला 'ती त्यांचीच बहीण', प्रकरण काय?
राज्यात अनेक विद्यार्थ्यांना 90 पेक्षा अधिक टक्के मिळाले, काहींना तर 100 टक्के सुद्धा मिळालेत. पण त्यांना झाला नसेल इतका आनंद 35 टक्के मिळवणाऱ्या शिवमला झालाय.