Washim News : वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील शेलुखडसे गावात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आपल्या वडिलांसोबत चिमुरडा शेतात गेला असता, त्याच्यावर काळाने घात केला आणि शेतातील काम सुरु असताना मुलाला सर्पदंश केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या मुलाचं नाव वेदांत खडसे (वय 9) तसेच वडिलांचे नाव गणेश खडसे असे आहे. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून गावात शोक व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबई-अहमदनगर महामार्गावर वळण घेताना ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चुराडा, बाप-लेकाचा जागीच मृत्यू
नऊ वर्षांच्या चिमुरड्याला सर्पदंश
मिळालेल्या माहितीनुसार, शेतात कांदा लागवडीचे काम सुरु असताना दबा धरून बसलेल्या सापाने वेदांतला दंश केला. त्यानंतर वेदांतने आपल्या वडिलांना घडलेला एकूण प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांनी सापाला मारले. मात्र, वेदांतला झालेल्या सर्पदंशामुळे अंगात विष चढू लागले. त्यानंतर त्याला रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
उपचारादरम्यान चिमुरड्यााचा मृत्यू
विष पूर्णपणे अंगात पसरले असता, त्याला वाशिम येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वेदांत खडसेंचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : पुण्यात विवाहित पुरुषाचे 18 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध, नंतर दुसऱ्यासोबत सूत, त्याची सटकली अन् चॉपरने हल्ला करत संपवलं
सध्या रब्बी हंगामामुळे शेतकरी शेतात राबत आहेत. अशातच शनिवारी अर्धी शाळा करून तो घरी आला. त्यानंतर त्याचे वडील गणेश खडसे यांनी त्याला शेतात नेलं असताना ही दुर्दैवी घटना घडली.
ADVERTISEMENT











