मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वळण घेताना ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चुराडा, बाप-लेकाचा जागीच मृत्यू

मुंबई तक

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नालासोपारा पूर्व पेल्हार परिसरात 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता भीषण अपघात झाला. ट्रक आणि रिक्षामध्ये झालेल्या भीषण धडकेत रिक्षातील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याने मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Accident
Mumbai Accident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ट्रकने रिक्षाला जोरदार धडक

point

महामार्गावर पाच जणांचे जीव गमावले

Mumbai Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नालासोपारा पूर्व पेल्हार परिसरात 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता भीषण अपघात झाला. ट्रक आणि रिक्षामध्ये झालेल्या भीषण धडकेत रिक्षातील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याने मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या बाप लेकाचे नाव समोर आले आहे.  रिक्षाचालक शेहजाग (वय 50) आणि त्यांचा मुलगा अतिक (वय 22) अशी त्यांची नावे आहेत. 

हे ही वाचा : पुण्यात विवाहित पुरुषाचे 18 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध, नंतर दुसऱ्यासोबत सूत, त्याची सटकली अन् चॉपरने हल्ला करत संपवलं

ट्रकने रिक्षाला जोरदार धडक

मिळालेल्या एकूण माहितीनुसार, पेल्हार पेट्रोल पंपाजवळ रिक्षा चालकाने वळण घेतलं आणि गुजराच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, या धडकेत रिक्षाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या घटनेदरम्यान, स्थानिकांनी तात्काळपणे घटनास्थळी धाव घेतली. 

हे ही वाचा : धाराशिव-जळगाव महामार्गावर गाड्या बंद पाडून लुटणारी टोळी अखेर गजाआड, पोलिसांनी 'असा' रचला सापळा

महामार्गावर पाच जणांचे जीव गमावले

या प्रकरणात पोलिसांनी माहिती दिली की, नागरिकांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महिन्याभरातच याच महामार्गावर विविध भागांमध्ये अपघातात पाच जणांचे जीव गमावले गेले असल्याचे वृत्त आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp