धाराशिव-जळगाव महामार्गावर गाड्या बंद पाडून लुटणारी टोळी अखेर गजाआड, पोलिसांनी 'असा' रचला सापळा
Dharashiv Crime : धाराशिव येथील NH 52 तसेच जळगाव जिल्ह्यातील NH 753H महामार्गावर मध्यरात्री दरोडा घालणारी टोळी पकडण्यात आली. याचप्रकरणात धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने राष्ट्रीय महामार्गावर जॅक टाकून प्रवाशांच्या गाड्या आडवत लूटमार करणाऱ्या अंतरजिल्ह्यात टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धाराशिव-जळगाव महामार्गावर गाड्या बंद पाडून लुटमार
टोळी अखेर गजाआड
पोलीस अधीक्षक रितू खोतकर यांच्या आदेशानंतर 'असा' रचला सापळा
Dharashiv Crime : धाराशिव येथील NH 52 तसेच जळगाव जिल्ह्यातील NH 753H महामार्गावर मध्यरात्री दरोडा घालणारी टोळी पकडण्यात आली. याचप्रकरणात धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने राष्ट्रीय महामार्गावर जॅक टाकून प्रवाशांच्या गाड्या आडवत लूटमार करणाऱ्या अंतरजिल्ह्यात टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. यात दोन आरोपी हे गजाआड गेले आहेत. पोलीस अधीक्षक रितू खोतकर यांच्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा : 'धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..', 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा पाहिल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
उमरगा-सोलापूर महामार्गावर कुटुंबावर हल्ला
16 ऑक्टोबर रोजी उमरगा-सोलापूर महामार्गावर डॉ. अब्दुल गफूर रऊफ जनैदी यांच्या कुटुंबावर अशाच प्रकारे हल्ला झाला होता. यात आरोपींना अडवून मारहाण करण्यात आली, तसेच सोन्याच्या वस्तू आणि काही रोख रक्कम लुटल्याची घटना समोर आली. संबंधित प्रकरणात मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन आरोपी गजाआड
संबंधित प्रकरणात गंभीर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी सुरु केला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि घटनेचा मागोवा घेऊनच तपास करण्यात आला. या प्रकरणात एकूण 7-8 लोकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दोन आरोपींच्या मुसक्याही आवळल्या गेल्या आहेत. अटकेत असलेल्यांची अर्जुन बालाजी शिंदे आणि आशोक हिरामन शिंदे अशी ओळख समोर आली.
हे ही वाचा : ठाणे: आईने पोटच्या मुलीला बळजबरीने वृद्ध NRI कडे पाठवलं! मुलीच्या बदल्यात दरमहा 2.5 लाख रुपये...
एकूण चौकशीत दोघांनी धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील मुरुम परिसरात तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात अशाच पद्धतीने दरोडे घालण्यात आल्याचा त्यांनी कबुलीनामा दिला. पोलिसांनी टोळीकडून XUV500 ही कार आणि ट्रक जप्त केल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आता या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांच्या आणि नागरिकांच्या मनातील भीती कुठेतरी कमी झालेली दिसून येत आहे.










