'धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..', 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा पाहिल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

मुंबई तक

Raj Thackeray facebook post : 'धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..', 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा पाहिल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; काय काय म्हणाले?

ADVERTISEMENT

Raj Thackeray facebook post
Raj Thackeray facebook post
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते"

point

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा पाहिल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Raj Thackeray facebook post : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. हा सिनेमा शिवाजी राजे भोसले बोलतोयचा दुसरा भाग आहे. दरम्यान, हा सिनेमा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाहिला असून त्यावर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सविस्तर भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलंय.

राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट पाहिला... समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही... पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाला पर्याय नाही...

आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे 'विकास' अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यांत बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे.

हेही वाचा : हडपसरमध्ये शाळकरी मुलीवर 23 वर्षीय तरुणाकडून अत्याचार, POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

हे वाचलं का?

    follow whatsapp