नितेश राणेंची कट्टर विरोधक असलेल्या संजय राऊतांसाठी काळजी करणारी पोस्ट, 6 शब्दात काय म्हणाले?

मुंबई तक

Nitesh Rane on Sanjay Raut : नितेश राणेंची कट्टर विरोधक असलेल्या संजय राऊतांची काळजी करणारी पोस्ट, नेमकं काय म्हणाले?

ADVERTISEMENT

Nitesh Rane on Sanjay Raut
Nitesh Rane on Sanjay Raut
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नितेश राणेंची कट्टर विरोधक असलेल्या संजय राऊतांसाठी 6 शब्दात पोस्ट

point

नितेश राणे नेमंक काय म्हणाले?

Nitesh Rane on Sanjay Raut, Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची गेल्या दोन दिवसांपूर्वी तब्बेत बिघडली असून, त्यांनी पुढील दोन महिन्यांसाठी सामाजिक आणि राजकीय उपक्रमांपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली. त्यांच्या या निर्णयानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

नितेश राणे काय म्हणाले? 

संजय राऊत आणि राणे कुटुंब यांच्यात अनेकदा मोठा वाद झालेला पाहायला मिळाला आहे. दोघांनी एकमेकांवर नेहमी सडकून टीका देखील आहे.. मात्र, राऊत यांच्या आजारपणाची बातमी समजताच नितेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले, “संजय राऊतजी... काळजी घ्या, लवकर बरे व्हा!” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

हेही वाचा : '...तर मराठी पैलवानावर अन्याय होईल', सिकंदर शेखसाठी खासदार सुप्रिया सुळेंकडून पंजाब सरकारशी बोलणी सुरु

हे वाचलं का?

    follow whatsapp