CCTV: निखील कांबळे मागून आला आणि सिद्धारामचा घेतला जीव, कुऱ्हाडीचे वार घालतच बसला.. नेमकं असं घडलं तरी काय?
Murder Case: तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे एका 25 वर्षीय तरुणाने 35 वर्षीय व्यक्तीची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

गणेश जाधव, धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथे आज (1 नोव्हेंबर) सकाळी साडे नऊच्या सुमारास भर चौकात कुऱ्हाडीने हल्ला करून एका व्यक्तीची गावातील तरूणानेच सगळ्यांसमोर निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे केशेगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृताचे नाव सिद्धाराम पंडित दहिटणे (वय 35, रा. केशेगाव ता. तुळजापूर) असे असून, आरोपीचे नाव निखिल सोमनाथ कांबळे (वय 25, रा. केशेगाव) असे आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सिद्धाराम दहिटणे हा केशेगाव येथील चावडी चौकातील एका हॉटेलजवळ खुर्चीवर बसून मोबाईल पाहत होते. त्याचवेळी आरोपी निखिल कांबळे हा मोटारसायकलवरून त्या ठिकाणी आला आणि हातातील कुऱ्हाड घेऊन मागून अचानक सिद्धाराम यांच्यावर हल्ला चढविला.
त्याने त्यांच्या मानेवर व शरीरावर सलग सात ते आठ कुऱ्हाडीचे वार करत त्यांना गंभीर जखमी केले. या जबर हल्ल्यात सिद्धाराम दहिटणे हे जागीच मृत्यूमुखी पडले. आरोपी हल्ला करून लगेच मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाला.










