सध्या, वाढत्या किमतीमुळे चांदीचे दागिने आता चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे, बाजारातील गुंतवणूकदारांचे तसेच अंकशास्त्राच्या तज्ज्ञांचे चांदीकडे लक्ष वेधलं जात आहे. ज्योतिषशास्त्रात, चांदीचा संबंध चंद्राशी असून जो मन, भावना आणि मनाच्या शांतीसाठी कारणीभूत असणारा ग्रह असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
2 मुलांक
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 2 असतो. 2 मुलांक असलेल्या लोकांसाठी चांदी अतिशय लाभदायक मानली जाते. असं म्हटलं जातं की, हा मुलांक असलेल्यांनी चांदीचे दागिने घालावी.
चांदीचे दागिने घाण्याचे फायदे
2 मुलांक असलेल्या लोकांनी चांदीचे दागिने घातल्याने शांती आणि आनंदाची भावना येते. या लोकांनी चांदी घातल्याने त्यांना महत्त्वाचे निर्णय सहजपणे घेता येतात. नातेसंबंध स्थिर राहतात. तसेच, राग आणि अहंकार दूर राहतात. यासोबतच, कौटुंबिक जीवनातील ताण कमी होतो आणि करिअरमध्ये प्रगती होते.
हे ही वाचा: Astrology: धनशक्ती राजयोग तयार होणार... 'या' 4 राशीच्या लोकांना मिळणार भरपूर पैसा!
2 मुलांक असलेले लोक ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार, चांदीची अंगठी घालू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही चांदीचं ब्रेसलेट किंवा बांगडी सुद्धा घालू शकता. तसेच, तुमच्या पर्समध्ये चांदीचं नाणं देखील ठेवू शकता. सोमवारच्या दिवशी, सोमवारी चांदीचे दागिने घालणं अधिक शुभ मानलं जातं. चांदी घालल्यानंतर दूध, तांदूळ किंवा पांढरी मिठाई दान करणं सुद्धा लाभदायक असल्याचं सांगितलं जात आहे.
लोकांसाठी सोने शुभ...
ज्योतिषशास्त्रात, सोनं हा सुर्याचा धातू असल्याचं मानलं जातं. सुर्याचा अंक 1 असून कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 1 असतो. हा मुलांक असलेल्या लोकांसाठी सोनं अतिशय शुभ मानलं जातं. 2 मुलांक असलेल्यांनी सोनं घातल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांची नेतृत्व क्षमता सुद्धा मजबूत असते. या लोकांनी सोनं घातल्याने त्यांच्या करिअरमध्ये स्थिरता मिळते आणि मान-सन्मान, प्रतिष्ठा तसेच सरकारी कामांमधील अडचणी दूर होतात.
ADVERTISEMENT











