अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येमागे नेमकं कोण? समोर आलं 'त्या' मुलीचं नाव, जिच्यामुळे वाद...

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. आता या प्रकरणात एका मुलीचं नावही समोर आलं आहे. या मुलीच्या सांगण्यावरून आरोपींनी आसिफवर हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे.

अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येमागे नेमकं कोण?

अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येमागे नेमकं कोण?

मुंबई तक

• 11:49 AM • 08 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या

point

अभिनेत्रीच्या भावाच्या हत्येमागे नेमकं कोण?

Asif Qureshi Murder Case: सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. दिल्लीच्या निजामुद्दीन स्टेशनजवळ गुरुवारी (7 जुलै) रात्री 11 वाजता घडलेल्या या घडनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला. 

हे वाचलं का?

खरंतर, बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ याचं स्कूटर पार्किंगवरून उज्ज्वल आणि गौतम नावाच्या दोन तरुणांशी भांडण झालं. त्यांच्यातील इतका टोकाला पोहचला की त्यावेळी दोन्ही आरोपी तरुणांनी असिफवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात आसिफ गंभीर पद्धतीने जखमी झाला आणि त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयत नेण्यात आलं. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनी आसिफला मृत घोषित केलं.

तरुणीचं नाव आलं समोर 

आसिफच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही तरुणांना अटक केल्याची माहिती आहे. आता या प्रकरणात एका मुलीचं नावही समोर आलं आहे. या मुलीचे नाव शैली असं असून तिच्याच सांगण्यावरून उज्ज्वल आणि गौतम यांनी आसिफवर हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा: अलार्म दाबताच रेड लाइट अन् आत संस्कारी माहोल... पोलिसांना समजली 'केम छो' बारची A to Z स्टोरी

आधी शिवीगाळ अन् नंतर हल्ला

आसिफची पत्नी साइनाज कुरेशीने दिलेला जबाब देखील समोर आला आहे. साइनाजच्या मते, आसिफ कामाहून घरी परतल्यानंतर शेजाऱ्यांसोबत स्कूटी पार्किंगवरुन त्याचा वाद झाला. त्यावेळी शेजाऱ्यांनी शिवीगाळ करत आसिफला स्कूटी दुसरीकडे पार्क करण्यास सांगितले. यानंतर वाद टोकाला पोहचला. याच शेजाऱ्यांसोबत नोव्हेंबर 2024 मध्ये सुद्धा त्यांचा वाद झाल्याचं साइनाजने सांगितलं. तसेच, आसिफचा भाऊ जावेद आणि काका सलीम यांच्या मते, आरोपींनी क्षुल्लक कारणावरून आसिफची निर्घृणपणे हत्या केली. प्रकरणातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याची त्यांनी मागणी केली आहे.

हे ही वाचा: "माझं वय मला माहित नाही..." दुसऱ्यांदा आई होणाऱ्या महिलेला विचारला 'तो' प्रश्न अन् पती थेट तुरुंगात...

पोलिसांनी दिली माहिती   

भोगल बाजार लेनमध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीवर परिसरातील दोन तरुणांनी धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. तसेच, पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरुन दोन्ही पक्षात मोठा वाद झाला. याच वादात उज्ज्वल नावाच्या तरुणाने धारदार शस्त्राने आसिफवर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित आसिफचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतिक्षा करत असल्याचं सांगण्यात आलं.

 

    follow whatsapp