Crime News: कोल्हापुरमधील शिये येथे राहणाऱ्या एका जोडप्याला लग्नाच्या पाच वर्षांनंतर दुसरं मुल होणार होतं. संबंधित महिला ही दुसऱ्यांदा आई होणार होती. त्यांच्या घरात दुसऱ्या बाळाच्या आगमनाची अगदी आनंदात तयारी सुरु होती. एके दिवशी, दोघे पत्नी पती बाळाचं आरोग्य व्यस्थित असल्याची खात्री करण्यासाठी रुग्णालयात पोहचले. पण, आरोग्य तपासणीमुळे त्याच्या आयुष्यात एक असं वादळ आलं ज्याची कोणीच कल्पना केली नव्हती.
ADVERTISEMENT
धक्कादायक बाब उघडकीस
एक तरुण आपल्या गरोदर असलेल्या पत्नीला आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेला. त्यावेळी डॉक्टरांनी संबंधित महिलेची आरोग्याशी संबंधित चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी महिलेला तिचं वय देखील विचारलं. मात्र, संबंधित महिला अशिक्षित असल्याकारणाने ती स्वत:चं वय सांगू शकली नाही. त्यावेळी डॉक्टरांना संशय आला आणि कागदपत्रे तपासली असता एक धक्कादायक बाब उघडकीस आली.
लग्नाला 5 वर्षे अन् वय मात्र केवळ 17 वर्षे...
महिलेच्या लग्नाला 5 वर्षे झाली असून ती आता दुसऱ्यांदा आई होणार होती. मात्र, तिच्या वयाबद्दल कळताच डॉक्टरांना मोठा धक्का बसला. संबंधित महिलेचं वय केवळ 17 वर्षे असल्याचं आढळून आलं. ही बाब कळताच डॉक्टरांनी तातडीने पोलीस आणि समाज कल्याण विभागाला याची माहिती दिली. खरंतर, अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे हा POCSO (पोक्सो) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा असल्याने पोलिसांना कारवाई करणं भाग होतं.
हे ही वाचा: उद्धव ठाकरे हेच भाजपचे नैसर्गिक मित्र, शिंदेंची शिवसेना केवळ ॲडजस्टमेंट? महाराष्ट्रातील 'या' चाली पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
पतीच्या विरोधात तक्रार दाखल
पती आणि आपल्या होणाऱ्या बाळासोबत सुखी आयुष्याची स्वप्नं पाहणाऱ्या महिलेला मात्र आता पतीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यास भाग पाडण्यात आलं. एका बाजूला नवऱ्याचं प्रेम आणि दुसऱ्यांदा आई होण्याचा आनंद तर दुसरीकडे कायदा... या कचाट्यात सापडलेली पीडित महिला अगदी गोंधळून गेली.
हे ही वाचा: Maharashtra Politics: प्रियंका चतुर्वेदींची PM मोदींशी भेट नक्कीच सहज नाही, नवा डाव रचलाय पण खेळी कोण आणि कधी...
डॉक्टरांच्या मते, संबंधित महिला अल्पवयीन असल्याकारणाने तिच्या आणि तिच्या होणाऱ्या बाळाला धोका उद्भवू शकतो. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई करत असल्याची सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
