Pune People Missing In Uttarakhand Disaster : उत्तरखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना नुकतीच घडली. अशातच पुण्यातील 24 मित्रांचा एक ग्रुप बेपत्ता झाल्याची माहिती समोर आलीय. हा ग्रुप पुण्याच्या 1990 बॅचच्या एका शाळेतील आहे. हे सर्व मित्र महाराष्ट्रातील 75 पर्यटकांच्या ग्रुपमध्ये सामील होते. बुधवारी गंगोत्रीजवळ धराली गावात आलेल्या पुरानंतर या 24 मित्रांचा एक ग्रुप बेपत्ता झाला आहे. याशिवाय, राज्यातील 74 अन्य टूरिस्टही उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
35 वर्षानंतर चारधामसाठी झाले होते एकत्र
पुण्याच्या मंचर येथील अवसारी खुर्द गावात अशोक भोर आणि त्याचे 23 मित्र, 35 वर्षानंतर चारधामच्या यात्रेसाठी गेले होते. ग्रुपचे लोक जे मुंबईसह अन्य ठिकाणी राहतात, त्या सर्वांनी 1 ऑगस्टला त्यांचा प्रवास सुरु केला होता. अशोक भोर यांचा मुलगा आदित्यने म्हटलं होतं की, त्याचं वडिलांशी 4 ऑगस्टला शेवटचं बोलणं झालं होतं. त्याच्या वडिलांनी फोनवर सांगितलं होतं की, ते गंगोत्रीहून जवळपास दहा किमी दूर आहेत. त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की, रस्त्यात झाडं कोसळल्याने आणि भुस्खलन झाल्याने ते अडकले होते. आदित्यने म्हटलं की, त्यांनंतर त्याच्याशी किंवा त्यांच्या अन्य ग्रुपसोबत कोणताही संपर्क झाला नाही.
हे ही वाचा >> 'प्रांजल खेवलकरांच्या मोबाइलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांचे 'ते' नग्न फोटो, मोलकरणीचे देखील...', रुपाली चाकणकरांचा खळबळजनक दावा
149 पर्यटकांमध्ये जवळपास 75 जणांचे फोन अजूनही बंद
राज्याच्या आपत्कालीन विभागाच्या एका अधिकाऱ्याने म्हटलंय की, अडककेल्या पर्यटकांशी संपर्क करणं कठीण होत आहे. परंतु, ते उत्तराखंड प्रशासनाच्या संपर्कात आहेत. मुंबईचे जवळपास 61 टूरिस्ट सुरक्षीत आहेत आणि ते हनुमान आश्रमात थांबले आहेत. दरम्यान, 149 पर्यटकांपैकी जवळपास 75 जणांचे फोन अजूनही बंद आहेत आणि नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.
सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं?
बुधवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर टूरिस्ट ग्रुपची माहिती शेअर करत म्हटलं की, त्यांनी राज्य सरकार आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडे पर्यटकांच्या सुरक्षीततेबाबत चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
हे ही वाचा >> राहुल गांधींनी दाखवली 'ती' मतदार यादी, पुरावे अन्... Voter list मध्ये नेमकी काय गडबड? समजून घ्या क्रोनोलॉजी
ADVERTISEMENT
