'प्रांजल खेवलकरांच्या मोबाइलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांचे 'ते' नग्न फोटो, मोलकरणीचे देखील...', रुपाली चाकणकरांचा खळबळजनक दावा

प्रांजल खेवलकर यांच्या मोबाइलमध्ये पोलिसांना महिला आणि तरूणींचे नग्न फोटो सापडले असल्याचा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

thousands of nude photos of women including maids in hidden folder in pranjal khewalkars mobile rupali chakankar sensational claim
रुपाली चाकणकरांचा खळबळजनक दावा
social share
google news

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना काही दिवसांपूर्वी पुण्यात रेव्ह पार्टी करत असल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्याबाबत अत्यंत धक्कदायक आणि खळबळ उडवून देणारे आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहेत. रुपाली चाकणकरांनी असा आरोप केला आहे की, प्रांजल खेवलकरांचा जो मोबाइल जप्त करण्यात आला आहेत त्यात तरुणी आणि महिलेचे तब्बल 1749 फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. जे नग्न किंवा अर्धनग्न असे आहेत. 

खेवलकरांच्या घरातील मोलकरणीचे देखील मोबाइलमध्ये सापडले वाईट अवस्थेतील फोटो

याशिवाय रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषदेत असाही दावा केला की, प्रांजल खेवलकरांच्या घरातील साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेतील फोटो त्यांच्या मोबाइलमध्ये सापडले आहेत. पाहा पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकरांनी प्रांजल खेवलकरांनी नेमके काय आरोप केले आहेत.

रुपाली चाकणकरांनी दिली प्रांजल खेवलकरांबाबत खळबळजनक माहिती

'प्रांजल खेवलकर यांच्या हडपसर येथील सोसायटीमधून जो मोबाइल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ज्ञांच्या माहितीने, तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाइलमधील असलेले महिलांसोबतचे चॅटचे स्क्रीनशॉट, पार्टीचे फोटो, व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न आणि अर्धनग्न फोटो काही अशोभनीय कृत्यांचे फोटो हाती लागले आहेत.'

हे ही वाचा>> एका रात्रीसाठी 6000..'त्या' गेस्ट हाऊसमध्ये सुरु होतं सेक्स रॅकेट, क्लिप व्हायरल! पोलिसांनी धाड टाकताच 3 महिलांना..

'या मोबाइलमध्ये जे व्हॉट्सअॅप चॅट करण्यात आले त्यात एकूण 7 मुली आढळून आल्या. या सातही मुलींची नावं आरूष या नावाने सेव्ह केली होती. म्हणजे आरूष या नावाची व्यक्ती या मुलींचं ह्यूमन ट्रॅफिकिंग करत होतं.'

'व्हॉट्सअॅप चॅटवरून असे लक्षात आले की, या मुलींना लोणावळा आणि पुणे येथे पार्टीसाठी बोलावलं होतं. पोलिसांनी छापा टाकला त्याच्या 2 दिवस अगोदर त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत दारू आणि हुक्का पार्टी सुरू होती. त्यावेळेसही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवल्या होत्या.' 

'यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे.'

हे ही वाचा>> 'काकी त्याला घरातून न्यायची आणि..' पुतण्या काकूसाठी झालेला वेडापिसा, लागलेली तिच्यासोबतच्या संबंधाची चटक पण...

'या मुलींना सिनेमात काम देतो असं सांगून बोलावलं आणि नंतर त्यांचा वापर करून घेतल्याचं आढळून आलं. तसंच त्यांना पैसेही दिले नाही. त्यामुळे मुलींनी वारंवार पैशाची मागणी केल्याचं दिसून येतंय. प्रांजल खेवलकर याने अनेक ठिकाणी मुलींना बोलावून पार्टी केल्याचं निष्पन्न झालं आहे.'

'प्रांजल खेवलकरच्या मोबाइलमध्ये जो हिडन फोल्डर होता त्यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत. त्यात महिलांचे नग्न आणि अर्धनग्न फोटो, व्हिडिओ आहेत.' 

'इतकंच काय.. अगदी घरातील साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेतील फोटो यामध्ये आहेत. बराचसा विषय असा आहे की, मी काही सांगण्यापेक्षा कालांतराने काही गोष्टी समोर येतील. मी त्या संदर्भात बोलू शकत नाही. बोलण्याला मर्यादा आहेत अशा प्रकारचे काही व्हिडिओ आणि फोटो यामध्ये आहेत.' असे धक्कादायक आरोप रुपाली चाकणकरांनी यावेळी केले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp