Maharashtra Politics: प्रियंका चतुर्वेदींची PM मोदींशी भेट नक्कीच सहज नाही, नवा डाव सुरू... खेळी कोण आणि कधी...

maharashtra politics priyanka chaturvedi meeting with PM Modi is definitely not easy a new plan has been hatched but who will play the trick and when

maharashtra politics priyanka  chaturvedi meeting with PM Modi is definitely not easy a new plan has been hatched but who will play the trick and when
Shiv Sena UBT and BJP (फोटो सौजन्य: Instagram)
social share
google news

Shiv Sena UBT and BJP: शिवसेना यूबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दोघेही दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांचे उद्देश वेगवेगळे आहेत, हे स्पष्ट आहे. पण, काहीतरी साम्य देखील आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्या त्यांना वेगळे असूनही एकमेकांशी जोडून ठेवतात. आणि, ते फक्त भूतकाळ नाही तर वर्तमान देखील आहे. अर्थात, भविष्य देखील त्यावर अवलंबून आहे.

हे सर्व अशा वेळी घडत आहे जेव्हा शिवसेना UBT खासदार प्रियंका चतुर्वेदी  यांना अचानक सोशल साइट X वर दोन फोटो पोस्ट केले. हे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या त्यांच्या भेटीचे आहेत. ज्यानंतर राजकीय वर्तुळात काही वेगळ्याच चर्चांना उधाण आलं. प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेच्या खासदार आहेत आणि शिवसेना UBT च्या प्रवक्त्या देखील आहेत.

या सगळ्या घडामोडी होत असताना दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्याच दिवसी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली. शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच ते त्यांना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते.

हे ही वाचा>> राहुल गांधींनी दाखवली 'ती' मतदार यादी, पुरावे अन्... Voter list मध्ये नेमकी काय गडबड? समजून घ्या क्रोनोलॉजी

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, प्रियांका चतुर्वेदी यांची पंतप्रधान मोदींसोबतची भेट आणि एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा हा निव्वळ योगायोग वाटत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अलिकडे घडलेल्या सर्व गोष्टींकडे पाहिले तर हे सर्व राजकीय प्रयोगाचा म्हणजेच दीर्घकालीन रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

प्रियांका चतुर्वेदी आणि PM मोदींची भेट

प्रियंका चतुर्वेदी पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या, परंतु अशा काही घटना घडल्या की त्या 2019 मध्ये शिवसेनेत गेल्या. खरं पाहिलं तर, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमध्ये असल्याने प्रियंका चतुर्वेदी या अजूनही काँग्रेससोबतच आहेत. 2019 मध्ये अशी चर्चा होती की, प्रियांका चतुर्वेदी या काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाऊ इच्छित होत्या, परंतु स्मृती इराणींवरील त्यांचे तीव्र हल्ले त्यांच्या भाजप प्रवेशात अडथळा ठरला होता. हा तो काळ होता जेव्हा स्मृती इराणी भाजपमध्ये खूप शक्तिशाली नेत्या होत्या.

दरम्यान, प्रियांका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो पोस्ट करताच, त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. फोटोंसोबतच प्रियंका चतुर्वेदी यांनी इन्स्टाग्रामवर कॅप्शन लिहिलं की, मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत भेटले... त्यांच्या मौल्यवान वेळेबद्दल आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या सर्व पैलूंवर विचार केल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते.'

शिवसेनेत सामील झाल्यानंतर अवघ्या एक वर्षानंतरच, उद्धव ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींना 2020 मध्ये राज्यसभेवर पाठविण्यात आलं आणि त्यामुळे त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षी एप्रिलमध्ये संपत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचं राजकीय बलाबल लक्षात घेता प्रियांका चतुर्वेदींना पुन्हा राज्यसभेवर पाठवणे शक्य वाटत नाही. आणि म्हणूनच मोदींशी झालेल्या भेटीमुळे प्रियांका चतुर्वेदी भाजपमध्ये सामील होतील अशी अटकळ व्यक्त केली जात आहे.

प्रियांका चतुर्वेदी केवळ स्वतःसाठी मोदींना भेटायला गेल्या असतील असेही नाही - उद्धव ठाकरेंच्या दूत म्हणून देखील त्या PM मोदींना भेटायला गेल्या असण्याची शक्यता आहे.

ठाकरे आणि शिंदे दोघांनाही भाजपची गरज

भाजपच्या बदललेल्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे यांच्या चिंता वाढल्या आहेत. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सरकारमध्ये सामील होण्याची ऑफर दिल्यानंतर. प्रकरण फक्त ऑफरपुरते मर्यादित नव्हते, तर त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मुलगा आणि सहकारी आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली होती. तर काही दिवसांनी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एका हॉटेलमध्ये भेटल्याची बातमीही समोर आली होती.

हे ही वाचा>> पक्षांतरावरुन सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना जबर दणका!

अलिकडच्या काळातील घडामोडींबद्दल बोलताना, एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्लीत पोहोचले ते देखील संपूर्ण कुटुंबासह. एकनाथ शिंदे यांच्यासोबत, त्यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे यांनीही PM मोदींची भेट घेतली. या बैठकीचे काही किस्सेही त्यांनी यावेळी सांगितले

बैठकीचे किस्से माध्यमांना सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मोदींनी प्रथम त्यांचा नातू रुद्रांशबद्दल विचारलं. शिंदे यांनी मोदींना सांगितले की तो घरी खेळत आहे म्हणून तो सोबत येऊ शकत नाही. पण, रुद्रांशने नक्कीच काहीतरी मागितले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की रुद्रांशने मोदी बाबांना लढाऊ विमाने आणि खेळणी आणण्यास सांगितले होते.

आणि हे सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ही चांगली मागणी होती... लढाऊ विमाने आपल्याला लढण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतात.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांच्या लढाईकडे लक्ष वेधत होते. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचा संघर्ष अजून संपलेला नाही आणि त्यांची भाजपसोबतही अंतर्गतरित्या धुसफूस सुरूच आहे. निवडणुकीनंतर भाजपने शिंदेंना मुख्यमंत्री बनवले नाही आणि आता ते उद्धव ठाकरेंनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरेंनी एकत्र येणं हे देखील एकनाथ शिंदेंसाठी अजिबात चांगले नाही. कारण तसं झालं तर भाजपला एकनाथ शिंदेंची गरजच उरणार नाही.

यामुळेच एकीकडे शिंदे हे पंतप्रधान मोदींना भेटत असताना तात्काळ प्रियंका चतुर्वेदी देखील पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात दाखल झाल्या. 

 

हे वाचलं का?

    follow whatsapp