Govt Job: सरकारी बँकेत नोकरीची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 'यूनियन बँक इंडिया'कडून वेल्थ मॅनेजर पदासाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेत अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात. या पदांवर अर्ज करण्यासाठी अॅप्लिकेशन विंडो 7 ऑगस्टपासून अॅक्टिव्ह करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार 25 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करु शकतात. या भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवार www.unionbankofindia.co.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात.
ADVERTISEMENT
प्रवर्गानुसार रिक्त पदांची संख्या
या भरतीसाठी वेगवेगळ्या प्रवर्गानुसार रिक्त पदांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. एससी (SC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण 37 पदे, एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 18 पदे, ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 67 पदे, ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना एकूण 25 पदे आणि जनरल ( Open) प्रवर्गातील उमेदवारांना एकूण 103 पदे निश्चित करण्यात आली आहेत.
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी किमान 25 वर्षे आणि कमाल 35 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सरकारी नियमांनुसार सूट देण्यात येईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि अपंग असलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत 10 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
हे ही वाचा: अनैतिक संबंधाच्या आड येत होता म्हणून... दीरासोबतच रचला हत्येचा कट अन् वाटेतच...
काय आहे पात्रता?
वेल्थ मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून दोन वर्षीय पोस्ट ग्रॅज्यूएशन ड्रिगी जसे की, एमबीए, एमएमएस किंवा पीजीडीबीए असणं अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांना संबंधित क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
कशी होईल निवड?
या रिक्त पदांसाठी उमेदवारांची लेखी परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल. परीक्षेत उमेदवारांवा दोन विभागात प्रश्न विचारण्यात येतील. भाग-1 मध्ये क्वांटिटेटिव एप्टीट्यूड, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी विषयाशी संबंधित 75 गुणांसाठी 75 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. भाग-2 मध्ये उमेदवारांना संबंधित विषयावर आधारित 150 गुणांसाठी 75 प्रश्न विचारण्यात येतील. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सा किंवा मुलाखतीसाठी आमंत्रित केलं जाईल.
हे ही वाचा: अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येमागे नेमकं कोण? समोर आलं 'त्या' मुलीचं नाव, जिच्यामुळे वाद...
अर्जाचे शुल्क
उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 1180 रुपये शुल्क भारावं लागेल. याव्यतिरिक्त, एससी (SC), एसटी (ST) आणि अपंग उमेदवारांसाठी 177 रुपये अर्जाचं शुल्क आकारण्यात येईल.
ADVERTISEMENT
