Mahesh Aher: 11वी नापास, बोगस पदवीचा आरोप, ठाण्याचे महेश आहेर कोण?

मुंबई तक

16 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 03:04 PM)

Mahesh aher thane : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर चर्चेत आले. मारहाण प्रकरणानंतर महेश आहेरांनी तक्रार दाखल केल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि इतर 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणानंतर आव्हाड महेश आहेरांविरुद्ध आक्रमक झाले आहेत. आव्हाडांनी आहेरांचा अंडरवर्ल्डशी संबंध असून, त्यांनी मुलगी नताशाच्या हत्येचा कट […]

Mumbaitak
follow google news

Mahesh aher thane : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर चर्चेत आले. मारहाण प्रकरणानंतर महेश आहेरांनी तक्रार दाखल केल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि इतर 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणानंतर आव्हाड महेश आहेरांविरुद्ध आक्रमक झाले आहेत. आव्हाडांनी आहेरांचा अंडरवर्ल्डशी संबंध असून, त्यांनी मुलगी नताशाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे महेश आहेर कोण? असा प्रश्न चर्चिला जात आहे. (who is thane municipal corporation assistant commissioner mahesh aher?)

हे वाचलं का?

जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केल्यानंतर ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर वादात सापडले आहेत. महेश आहेर हे वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप झालेले आहेत.

ठाणे महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त अधिकारी महेश आहेर असल्याचंही सांगितलं जातं. ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांशी त्यांचं नाव जोडलं जातं. महेश आहेर हे वादामुळे चर्चेत आल्यानंतर त्यांचे यापूर्वीचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Jitendra Awhad : “मला व कुटुंबियांना मारण्याचा महेश आहेरचा कट”

11वी नापास, बोगस पदव्या?

रेकॉर्डनुसार महेश आहेर यांनी 1983 मध्ये ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात कला शाखेत 11 वी साठी प्रवेश घेतला होता. 1984 मध्ये ते नापास झाले. त्यानंतर 1985 मध्येही नापास झाले. सलग दोन वर्ष नापास झाल्यानंतर महेश आहेर यांनी 1985 मध्ये शिक्षण सोडलं.

महेश आहेर यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर त्यांची शैक्षणिक प्रगतीबद्दलचा शेरा खूप खराब (Poor) असा आहे.

महेश आहेर हे 1985 मध्ये ठाणे महानगरपालिका सेवेत कनिष्ठ लिपीक म्हणून रुजू झाले. 2016 मध्ये त्यांना अ वर्ग लिपिक म्हणून बढती मिळाली.

Jitendra Awhad : आव्हाडांसह सात जणांविरुद्ध पोलिसांत 307 चा गुन्हा

2017 मध्ये महेश आहेर यांनी सिक्कीम युनिवर्सिटीमधून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर प्रभारी पद लावून विविध ठिकाणी सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मात्र, त्यांनी घेतलेली ही पदवी बोगस असल्याचा आरोप झालाय. 12वी पास आहे की नाही याबद्दल साशंकता राजकीय नेत्यांनी व्यक्त केली होती.

त्यानंतर महेश आहेर अनेकदा वादात आले. गुन्हेगारांशी संबंध असल्याचं भासवून महापालिका अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना दमदाटीची केल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्यानं होत आहे.

त्याच्या विरोधात आंदोलन करणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना दमदाटी केल्याचा आरोप आहे. घाटकोपर येथे नेऊन बाबाजी नामक गुंडाकडून धमकी दिल्याचा आरोप चव्हाण यांनी केलेला आहे.

त्यानंतर आता माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेरांवर गंभीर आरोप केले आहेत. आहेर यांनी अंडरवर्ल्ड संबंधित लोकांसोबत मुलगी नताशा आणि जावयाला ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी आव्हाडांनी पोलिसांत तक्रारही दिलेली आहे.

    follow whatsapp