India pakistan ceasefire : भारत पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तीन दिवस युद्ध सुरू होतं. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानच्या एक दोन नाहीतर 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. ज्यात काही दहशतवादी मारले गेले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या युद्धासाठी पाकिस्तानचे 4 बिलियन डॉलर्सचे नुकसान झालं आहे. ज्यात त्यांनी 2.4 मिलियन डॉलर्स कर्ज घेतलं होतं.
ADVERTISEMENT
हेही वाचा : "पापाचा घडा भरला होता, पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं...", लेफ्टनंट जनरल म्हणाले आरपारची तयारी होती
पहलगामध्ये झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर 9 मे रोजी पाकव्याप्त काश्मीर आणि भारत - पाकिस्तान सीमेवर गोळीबाराचं सत्र सुरूच होतं. त्यावेळी भारतीय सैन्यांनी हवाई हल्ल्याच्या माध्यमातून पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टिमला लक्ष्य करत उद्ध्वस्त केलं. या तीन दिवसांच्या युद्धानंतर शनिवारी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला. अशातच दोन्ही देशांतील शेअर बाजारात नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, पाकिस्तानच्या तुलनेत भारताच्या शेअर बाजारात स्थिरता आहे. दरम्यान पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांदरम्यान झालेल्या युद्धामुळे पाकिस्तानची अर्थिक परिस्थिती खालावली आहे.
पाकिस्तानची अर्थिक परिस्थिती खालावली
ज्यात युद्धादरम्यान, लष्करी कारवायांसाठी 25 दशलक्ष अब्ज आर्थिक नुकसान झाले.
ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या कारवाया करण्यात आल्या. त्यासाठी 300 दशलक्ष अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले.
पाकिस्तानच्या शेअर बाजारात 2.5 अब्ज डॉलर्सची घसरण झाली.
तर पीएसएलचे निलंबनासाठी 10 दशलक्ष अब्ज डॉलर्स एवढा खर्च झाला.
विमान वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने 20 दशलक्ष अब्ज पाकिस्तानला आर्थिक तोट्याचा सामना करावा लागला.
हेही वाचा : भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम ... 8 कंपन्यांचं 1.6 लाख कोटींचं नुकसान, रिलायन्सलाही फटका
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती भारताच्या तुलनेत अगदीच खराब आहे. सध्या असलेले परकिय चलन साठे हे पुढील काही वर्षांमध्ये कर्ज फेडण्यासाठी पुरेसे नसल्याचं बोललं जात आहे. अशातच भारताकडे 688 दशलक्ष अब्जाहून अधिकचा राखीव निधी आहे.
ADVERTISEMENT
