पुणे : युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलमध्ये लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवत धमकी...

pune crime पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका प्रसिद्ध उद्योगपतीने एका एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणीवर अनेक ठिकाणी बलात्कार केला.

pune crime

pune crime

मुंबई तक

29 Oct 2025 (अपडेटेड: 29 Oct 2025, 09:09 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे जिल्ह्यातील बारामतीत धक्कादायक घटना

point

उद्योगपतीकडून पीडितेवर रेल्वे स्टेशनवरजवळील कारमध्ये लैंगिक शोषण 

Pune Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका प्रसिद्ध उद्योगपतीने एका एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या  तरुणीवर अनेक ठिकाणी नेत तिचं लैंगिक शोषण केलं. या प्रकरणात आरोपी उद्योगपतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लैंगिक शोषणाच्या प्रकरणात नामांकित उद्योगपती मनोज कुंडलिक तुपे असे त्याचे नाव आहे. ते बारामती शहरातील ग्रीन पार्क विद्याप्रतिष्ठानजवळ राहतात. पीडितेच्या माहितीवरून मनोज तुपेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना 2021 ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीदरम्यान सुरुच होती. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : लेकाची वडिलांकडे दारूसाठी पैशांची मागणी, पैसे देण्यास नकार, लोखंडी रॉडने जन्मदात्याचा केला खून... नागपूर हादरलं

नेमकं काय घडलं? 

पीडितेच्या तक्रारीनुसार, 2020 मध्ये, तिचे शिक्षण पूर्ण करून एमपीएससीची तयारी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, तिने पुण्यात शिक्षण घेतलं आणि ती तिथेच राहायला गेली. याच काळात, 2021 मध्ये, पीडितेची बारामती येथे आरोपी मनोज तुपेशी भेट झाली. या काळातच त्याने पीडितेचा मोबाईन फोन नंबर मिळवला आणि म्हणाला की, 'मी एक मोठा व्यापारी आहे आणि मी तुला आणि माझ्या मित्राला चांगली नोकरी मिळवून देईन'. त्यानंतर दोघेही फोनवर बोलत होते आणि त्यानंतर तरुणी ही शिक्षणासाठी पुण्याकडे गेली. 

तिच्या इच्छेविरुद्ध रेल्वे स्टेशनवरजवळील कारमध्ये लैंगिक शोषण 

ऑगस्ट 2021 मध्ये, तुपेने पीडितेला जेवणासाठी बोलावले आणि हडपसर येथे तिच्या इच्छेविरुद्ध रेल्वे स्टेशनवजवळील कारमध्ये लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर, आरोपीने तिला वारंवार पुण्यात काही हॉटेलमध्ये नेत लग्न करण्याचे आश्वासन देत तिचं लैंगिक शोषण केलं. 

हे ही वाचा : कोल्हापूर हादरलं, बारमध्ये वेटरसोबत वाद झाला अन् चौघांनी मिळून बँक व्यवस्थापकाला धारदार शस्त्रांनी संपवलं

पीडितेचं ऑक्टोबर 2022 मध्ये लग्न झाले होते, परंतु ऑगस्ट 2023 मध्ये तिने तिच्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पीडिता ताणावाखाली आपलं आयुष्य जगत होती. आरोपीने तिच्याशी संपर्क साधला आणि 'चल लग्न करूया, ब्रेकअप करायचा नाही', असे म्हणत त्याने पुन्हा पीडितेचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर लग्नाचा विषय काढल्यानंतर आरोपी संतापू लागला आणि पीडितेशी वाद घालू लागला.

आरोपीने पीडितेकडे लग्न करण्यास नकार दिला, 'समाजात माझी प्रतिष्ठा आहे आणि मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही', पीडितेनं त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले तेव्हा आरोपीने तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले आणि तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली.

    follow whatsapp