सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अंधारेंनी वेलांटीची चूक काढली, आता अश्विनी बिद्रेंचे पतीही समोर, सातारा SP वर गंभीर आरोप

Satara female doctor suicide case : डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अंधारेंनी वेलांटीची चूक काढली, आता अश्विनी बिद्रेंचे पतीही समोर, सातारा SP वर गंभीर आरोप

Satara femal doctor suicide case

Satara femal doctor suicide case

मुंबई तक

30 Oct 2025 (अपडेटेड: 30 Oct 2025, 09:37 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अंधारेंनी वेलांटीची चूक काढली

point

आता अश्विनी बिद्रेंचे पतीही समोर, सातारा SP वर गंभीर आरोप

Satara female doctor suicide case : फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. शिवसेना (ठाकरे गट)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात थेट पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सुषमा अंधारे यांनी दिवंगत पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडाचा संदर्भ देत या प्रकरणातही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. "बिद्रे हत्याकांडात Y' आणि 'U' अक्षरांनी हत्येचं गूढ उलगडलं होतं. त्याच प्रमाणे या प्रकरणात महिला डॉक्टरने तक्रारी करण्यासाठी लिहिलेल्या पत्रांमध्ये निरीक्षक शब्दाला दुसरी वेलांटी आहे आणि आत्महत्या करताना हातावर लिहिलेल्या मजकुरामध्ये पहिली वेलांटी आहे", असं सुषमा अंधारे यांनी सांगितलंय. दरम्यान, यानंतर अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे साताऱ्यांच्या एसीपींवर आरोप करताना काय म्हणाले?

या पार्श्वभूमीवर अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनीही साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, “अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या तपासावेळी तुषार दोशी यांनी आरोपी अभय कुरुंदकर याला मदत केली होती. त्याबाबत आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारही केली होती, पण उलट त्यांनाच पुढे राष्ट्रपती पदक देण्यात आले. आता हाच अधिकारी फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू तपासाचे नेतृत्व करत असल्याने या प्रकरणात न्याय मिळेल, अशी अपेक्षा ठेवणे कठीण आहे.”

हेही वाचा : संभाजी ब्रिगेडच्या नकुल भोईर हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्वीस्ट, पत्नीने 21 वर्षीय प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

राजू गोरे यांनी पुढे सांगितले की, “त्या काळात तुषार दोशी हे क्राइम डीसीपी म्हणून तपास पाहत होते. पोलीस अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी एका आरोपीला माफीचा साक्षीदार बनविण्याची तयारी दाखवली होती, मात्र त्यावेळी तुषार दोशींनीच तपासात अडथळा आणला. आम्ही याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती, पण कोणतीही कारवाई झाली नाही. उलट त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.”

गोरे पुढे म्हणाले की, “जर सातारा जिल्ह्याची जबाबदारी आणि डॉक्टर युवतीच्या मृत्यूचा तपास तुषार दोशी यांच्या हातीच राहिला, तर न्याय मिळण्याची शक्यता अत्यल्प आहे. अश्विनी बिद्रे हत्याकांडातही आरोपी अभय कुरुंदकरचा पर्दाफाश त्याच्या आणि अश्विनीमधील मेसेजमुळे झाला होता, आणि हा तपशील सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो यांच्या चाणाक्ष नजरेतून समोर आला होता.”

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून लिहिले आहे की, “पत्रकार परिषदेत मी हस्ताक्षरातील फरकावरून अश्विनी बिद्रे प्रकरणाचा दाखला दिला होता. यावरच बिद्रे यांच्या पती राजू गोरे यांनी माझ्या वक्तव्याला पुष्टी देत आणखी धक्कादायक खुलासा केला आहे. सध्या साताऱ्याचे एसपी असलेले तुषार दोशी हेच अधिकारी त्या हत्याकांडाच्या तपासात गुंतलेले होते,” असे त्यांनी नमूद केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

हॉटेलच्या छतावरून नग्न अवस्थेत खाली पडली तरुणी... पोलिसांनी ‘त्या’ खोलीत पोहोचताच पाहिलं धक्कादायक दृश्य!

    follow whatsapp