Kolhapur Crime : कोल्हापूरातील इचलकरंजीतील कबनूर येथील मुख्य मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा डोक्यात दगड आणि सिमेंट पाइप घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अभिनंदन जयपाल कोल्हापुरे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासातूनच स्पष्ट झाले आहे. या एकूण तपासातून आरोपींची नावे समोर आली आहेत. या प्रकरणी पंकज संजय चव्हाण, रोहित जगन्नाथ कोळेकर, विशाल राम लोंढे आणि आदित्य संजय पोवार अशी अटकेत असलेल्यांची नावे समोर आली आहेत. या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या शाखेनं काही तासांत अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अर्धकेंद्र योगाने 'या' राशीतील लोकांना आर्थिक लाभ मिळून यश संपादन होईल, काय सांगतं राशीभविष्य?
याबाबत पोलिसांना मिळालेली माहिती अशी की, अभिनंदन हा एका खासगी बँकेत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून काम करत होता. दिनांक 27 रोजी सोमवारी रात्री तो कोल्हापूर रोडवरील एका बारमध्ये गेला होता. तेथे वेटरसोबत वाद झाल्यानंतर तो बारमधून घरी गेला.
डोक्यात दगड आणि सिमेंट पाईपने हल्ला
त्यानंतर काही वळातच पंकज चव्हाण व अन्य अनोळखी तीन ते चार जण घरी आले होते. त्यांची बारमध्ये वादविवाद झाल्याने अभिनंदन यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाणार असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगत अभिनंदन यांना सोबत आणलेल्या मोटारसायकलवरून बसवून नेण्यात आले. मुख्य मार्गावर पेट्रोल पंपासमोर त्यांच्या डोक्यात दगड आणि सिमेंट पाईपने हल्ला केला. ही घटना मध्यरात्री घडल्याचे सांगण्यात येते.
हे ही वाचा : शेतकऱ्यांच्या मागणीसाठी महामार्ग रोखले, आंदोलकांकडून भारत बंदचा इशारा, नेमक्या काय आहेत मागण्या?
अभिनंदन रक्ताच्या थारोळ्यात
बराच वेळ झाला असला तरी अभिनंदन घरी परत येत नसल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधा शोध सुरु केली आहे. तेव्हा अभिषेकला अभिनंदन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, खुनामागचं खरं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. या प्रकरणात आता पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT











