वयाने मोठ्या असलेल्या तरुणीवर जीवापाड प्रेम, साताऱ्यातील विद्यार्थ्याचं वसतीगृहात असताना भयानक पाऊल

मुंबई तक

29 Oct 2025 (अपडेटेड: 29 Oct 2025, 01:42 PM)

Satara Crime : वयाने मोठ्या असलेल्या तरुणीवर जीवापाड प्रेम, साताऱ्यातील विद्यार्थ्याने वडिलांना मेसेज करत वसतीगृहात असताना केली आत्महत्या

Satara Crime

Satara Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वयाने मोठ्या असलेल्या तरुणीवर जीवापाड प्रेम

point

साताऱ्यातील विद्यार्थ्याचं वसतीगृहात असताना भयानक पाऊल

Satara Crime : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने अभ्यासाचा ताण आणि वयाने मोठ्या असलेल्या युवतीवरील प्रेमाला विरोध होईल या भीतीतून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी या मुलाने आपल्या वडिलांना व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवत नैराश्यात असल्याची कबुली दिल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

17 वर्षीय तरुणाने वसतीगृहात उचललं टोकाचं पाऊल 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी मूळचा पाटण तालुक्यातील असून, शिक्षणासाठी साताऱ्यातील एका वसतिगृहात राहात होता. दिवाळीच्या सुटीनंतर तो नुकताच वसतिगृहात परतला होता. मात्र, सुट्टी संपून आल्याच्या दोन दिवसांनीच त्याने मध्यरात्री आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यापूर्वी त्याने आपल्या वडिलांना एक भावनिक मेसेज पाठवला होता, जो त्यांनी सकाळी वाचला आणि त्यानंतर त्यांनी मुलाचा शोध घेतला असता, त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले.

हेही वाचा : सातारा : मोबाईलच्या अतिवापरावरून दिलेला सल्ला ठरला जीवघेणा; अल्पवयीन रूममेटने गळा आवळून केला खून

घरच्यांकडून प्रेमाला विरोध होण्याची भीती

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याची बहीणही एका मुलावर प्रेम करत होती. कुटुंबीयांनी तिच्या प्रेमसंबंधांना विरोध केला होता. त्याच पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्याला आपल्या प्रेमालाही घरच्यांकडून विरोध होईल, अशी भीती सतावत होती. त्याचबरोबर शिक्षणाचा ताण आणि मानसिक दडपण या सर्व गोष्टींनी तो कोलमडून गेला होता. त्यामुळे त्याने व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून आपलं आयुष्य संपवलं.

घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी एका विद्यार्थ्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस हवालदार किरण निकम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मानसिक ताण, प्रेमभंग आणि घरगुती दबाव या कारणांमुळे युवकांमध्ये वाढणारी नैराश्याची भावना ही घटना अधोरेखित करत असून, अशा घटना टाळण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद आणि मानसिक आधाराची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

दोघांनी ट्रेनसमोर उडी मारली अन्... रेल्वे रूळावर पीडितेचा नग्न अवस्थेत सापडला मृतदेह! लव्ह स्टोरीचा ‘असा’ झाला दि एण्ड..