Govt Job: रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या उमेदवारांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. RRB ने जूनिअर इंजिनीअर या पदाच्या एकूण 2569 रिक्त जागांसाठी भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. रेल्वेमध्ये कनिष्ठ अभियंता पदावरील नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र असणारे उमेदवार लवकरच या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जाची प्रक्रिया 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. तसेच, या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार अर्ज केल्यानंतर 2 डिसेंबर 2025 पर्यंत अर्जाचं ऑनलाईन माध्यमातून शुल्क भरू शकतात. उमेदवारांना त्यांच्या फॉर्ममध्ये सुधारणा करण्यासाठी 3 डिसेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत कालावधी दिला जाईल.
ADVERTISEMENT
किती मिळेल पगार?
या भरतीच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 35,400 रुपये वेतन दिलं जाईल.
वयोमर्यादा
जूनिअर इंजिनीअर पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 33 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
हे ही वाचा: मुंबईतील इनकम टॅक्स अधिकाऱ्याला तब्बल 44 लाख रुपयांना गंडा... मॅट्रिमोनियल साईटवर ओळख झाली अन् जाळ्यात अडकला
अर्जाचं शुल्क
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी प्रवर्गानुसार शुल्क निश्चित केलं गेलं आहे. सामान्य (Open), आर्थिकदृष्ट्या कमकुवत (EWS) आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे, तर अनुसूचित जाती (SC)/ अनुसूचित जमाती (ST), महिला आणि अपंग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये आहे.
हे ही वाचा: दोघांनी ट्रेनसमोर उडी मारली अन्... रेल्वे रूळावर पीडितेचा नग्न अवस्थेत सापडला मृतदेह! लव्ह स्टोरीचा ‘असा’ झाला दि एण्ड..
कशी होणार निवड?
उमेदवारांची निवड स्टेज-1, स्टेज-2, डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल. स्टेज-1 परीक्षेत उमेदवारांना गणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, सामान्य जागरूकता आणि सामान्य विज्ञान विषयांमधून 100 गुणांचे 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. या परीक्षेचा कालावधी एकूण 90 मिनिटे असेल तसेच, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुणाचं निगेटिव्ह मार्किंग असेल. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांसाठी स्टेज 2 परीक्षा देखील घेतली जाईल. स्टेज-२ परीक्षेत, उमेदवारांना १५० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.
ADVERTISEMENT











