महिला डॉक्टरची हत्या की आत्महत्या? 7 वाजता मृत्यू, बहिणीच्या स्टेटसला 11 वाजता लाईक? सुषमा अंधारेंचे सनसनाटी दावे

Sushma andhare on Satara female doctor case : महिला डॉक्टरची हत्या की आत्महत्या? 7 वाजता मृत्यू, बहिणीच्या स्टेटसला 11 वाजता लाईक? सुषमा अंधारेंचे सनसनाटी दावे

Sushma andhare on Satara female doctor case

Sushma andhare on Satara female doctor case

मुंबई तक

30 Oct 2025 (अपडेटेड: 30 Oct 2025, 12:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिला डॉक्टरची हत्या की आत्महत्या?

point

मृत्यूनंतर रात्री 11 वाजता बहिणीचा स्टेटस लाईक केला?

point

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे सनसनाटी दावे

Sushma andhare on Satara female doctor case : साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरुन राज्यातील राजकारण तापलंय. विरोधकांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महिला डॉक्टरने आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचा सनसनाटी दावा केलाय. याबाबत त्यांनी काही शंकास्पद पुरावे देखील मांडले आहेत. सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

हे वाचलं का?

निरीक्षक शब्दाच्या वेलाटींवरुन सुषमा अंधारेंनी व्यक्त केली शंका

सुषमा अंधारे यांनी दोन कागद दाखवले आणि त्या म्हणाल्या, तुम्ही ही कागदं पाहिली तर डॉक्टर महिलेची आत्महत्या झाली की हत्या? हे विचारण्यासाठी पुरेसा वाव आहे. महिला डॉक्टरने 9 वेळेस चार पानांचं पत्र लिहिलंय. यामध्ये निरीक्षक या शब्दाची वेलांटी दुसरी आहे. हातावर सुसाईड नोट आहे, त्यावर निरीक्षक शब्दाची वेलांटी पहिली आहे.

हेही वाचा : गंजलेल्या नंबर प्लेटची स्कुटी घेऊन फिरणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला 2 हजारांचा दंड, व्हायरल व्हिडीओतील 'त्या' तरुणाला यश

बहिणीने ठेवलेल्या स्टेटस 11 वाजून 6 मिनीटांनी लाईक केला?

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, पीडित महिला डॉक्टरच्या बहिणीने व्हाट्सअॅपला एक स्टेटस ठेवला होता. तो स्टेटस पीडित महिला डॉक्टरने 11 वाजून 6 मिनीटांनी लाईक केला आहे. तिचा मृत्यू आधीच 7 वाजता झाला असल्याचं दाखवत असाल तर नंतर 11 वाजता ती व्हाट्सअॅप स्टेटस लाईक कसा करते? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय.

फलटणमधील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. तिने खरोखर आत्महत्या केली की? तिची हत्या झाली? हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. ठाकरेंच्या शिवेसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. दरम्यान, यानंतर सुषमा अंधारे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते महेबुब शेख यांना धमक्यांचे फोन आले आहेत. त्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना कोणालाही फोन करुन अपशब्द वापरु नये, असं आवाहन केलंय. संविधानिक मार्गाने सर्व आरोपांना उत्तर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. शिवाय त्यांनी यावेळी पुन्हा एकदा आरोप फेटाळले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पुणे : युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलमध्ये लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवत धमकी...

    follow whatsapp