पुण्याची गोष्ट : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी जोरदार प्रत्युत्तर देत प्रचारास सुरुवात केली. आरक्षण जाहीर झाल्यानंतर, उमेदरावारांनी गावातील चौकांमध्ये बॅनरबाजी करून आपली उमेदवारी दर्शवली आहे. तसेच दिवाळी सणानिमित्त मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मिठाई, कपडे आणि साड्यांचे बॉक्स वाटण्यात आले, याचवरून मतदारांना आकर्षित करण्यात आले ते सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नांदेड हादरलं! प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलाचा खून, बाप-लेकाने मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकला
सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागा
खेड तहसीलमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद हे सर्वसाधारणपणे खुले आहे, तर पंचायत समितीच्या अध्यक्षपदावरून सर्वसाधारण महिलांसाठी राखीव जागा आहे, ज्यामुळे विविध प्रवर्गातील उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण होते. खेड तहसीलमध्ये येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका महिलांसाठी एक मोठी राजकीय संधी घेऊन येत आहे.
मोठया संख्येनं इच्छुक महिलांना निवडणूक लढवण्याची संधी
पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या आरक्षणामुळे मोठया संख्येनं इच्छुक महिलांना निवडणूक लढवण्याची संधी निर्माण झालेली आहे. राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि अनेक इच्छूक महिला नेत्या निवडणुकीची तयारी करत आहेत. तहसीलदाराच्या प्रत्येक गट आणि गण मध्ये संभाव्य. महिलांच्या उमेदवारीत लक्षणीय वाढ झालेली आहे.
स्थानिक राजकारणात नेतृत्व करण्यासाठी आणि निर्णय एकूण प्रक्रियेत त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हे आरक्षण महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ प्रदान करणारे आहे. अंतिम निवडणुकीची तारीख जाहीर होईपर्यंत, कोणत्या महिला उमेदवार अंतिम निवडणूक लढवतील हे अद्यापही निश्चित करण्यात आलेलं नाही.
निवडणुकीपूर्वीच संभाव्य उमेदरावांच्या वाढत्या हालचाली
अशातच आता निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षातील संभाव्य उमेदरावांच्या वाढत्या हालचाली आणि मतदारांकडे जाऊन प्रचार करत आहेत. उमेदवारांच्या वाढत्या हालचाली आणि मतदारांपर्यंत पोहोण्याच्या प्रयत्नांमुळे, खेड तहसीलमध्ये दिवाळी हंगाम जोमाने सुरु आहे.
हे ही वाचा : सरकारी शिक्षकाकडून गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह दुचाकीवरून चार जिल्ह्यांत फिरवला, 'त्या' एका फोटोवरून...
याचमुळे आता निवडणुकांपूर्वीच निवडणुकीचे वातावरण चांगले तापले आहे. या परिस्थितीवरून असे दिसून की, राखीव जागेमुळे स्थानिक राजकाणारच अचानकपणे खळबळ माजली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच स्पर्धेत वाढ झाल्याचे चित्र आहे. मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी देवदर्शन ही प्रचाराची रणनीती आखली आहे.
ADVERTISEMENT











