Maharashtra State Board 10th Result : राज्यात आज दहावीचा निकाल जाहीर झाला. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालक या निकालाकडे डोळे लावून बसलेले होते. एकूण 62 विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. पुणे, नागपूर,छत्रपती संभाजी नगर,मुंबई,कोल्हापूर, अमरावती,नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून 15 लाख 58 हजार 020 नोंदी झा्ल्या होत्या. तर या परीक्षेत 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी तब्बल 14,55433 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत.विशेष म्हणजे यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.
ADVERTISEMENT
राज्यात पुन्हा मुलींनीच मारली बाजी
राज्यात पास होण्याचं प्रमाण मुलींचं जास्त आहे. तर मुलं मुलींपेक्षा तब्बल 4 टक्क्यांनी मागे आहेत. राज्यात यंदा तब्बल 96.14 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलं उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 92.31 इतकी आहे. त्यामुळे मुली मुलांपेक्षा 3.83 ने पुढे आहेत.
हे ही वाचा >> sscresult.mahahsscboard.in, MSBSHSE SSC Result 2025: दहावीचा निकाल जाहीर, 'या' 7 वेबसाईटवर झटपट पाहा तुमचा निकाल
राज्यात सर्वात जास्त निकाल हा कोकण विभागाचा असून, कोकण विभागात तब्बल 98.82 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल नागपूरमध्ये लागला आहे. नागपूरमध्ये 90.78 टक्के इतका निकाल लागला आहे.
दहावीचा विभागवार निकाल
पुणे -94.81 टक्के
नागपूर- 90.78 टक्के
संभाजीनगर- 92.82 टक्के
मुंबई- 95.84 टक्के
कोल्हापूर- 96.78 टक्के
अमरावती- 92.95 टक्के
नाशिक- 93.04 टक्के
लातूर- 92.77 टक्के
कोकण- 99.82 टक्के
ADVERTISEMENT
