CBSE 12th Result: CBSE 12 वीचा निकाल जाहीर, किती टक्के विद्यार्थी झाले पास? असा पाहा तुमचा निकाल

CBSE बोर्डाकडून 2025 वर्षातील 12 वीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या 12 वी CBSE बोर्डाच्या परीक्षेत 88.39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

CBSE 12वीचा निकाल जाहीर, किती टक्के विद्यार्थी झाले पास?

CBSE 12वीचा निकाल जाहीर, किती टक्के विद्यार्थी झाले पास?

मुंबई तक

• 12:12 PM • 13 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

CBSE 12 वीचा निकाल जाहीर

point

CBSE 12 वी परीक्षेत किती टक्के विद्यार्थी झाले पास?

point

कुठे आणि कसा पाहाल निकाल?

CBSE Board 12th Result Date: CBSE बोर्डाकडून 2025 वर्षातील 12 वीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या 12 वी CBSE बोर्डाच्या परीक्षेत 88.39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थी cbseresults.nic.in आणि results.cbse.nic.in — या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकता. 

हे वाचलं का?

यावर्षी एकूण 44 लाखहून अधिक विद्यार्थांनी ही बोर्डाची परीक्षा दिली आहे. या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 18 मार्च पर्यंत सुरू होत्या, तसेच बारावी इयत्तेचा शेवटचा पेपर हा 4 एप्रिल रोजी घेण्यात आला होता. 

'या' वेबसाइट्सवर पाहता येईल निकाल

CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर आपली मार्कशीट cbse.gov.in, cbseresults.nic.in आणि results.cbse.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट्सवर तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, विद्यार्थी आपलं डिजीटल मार्कशीट आणि प्रमाणपत्र DigiLocker च्या माध्यमातून सुद्धा प्राप्त करू शकतात. 

विद्यार्थ्यांना सोप्यारितीने निकाल तपासता यावा, यासाठी बोर्ड त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएस पाठवून डिजीलॉकर लॉगिन आयडी आणि अॅक्सेस कोड शेअर करेल. यासोबतच, विद्यार्थी  UMANG अॅप आणि  SMS सेवेद्वारेही निकाल प्राप्त करू शकतात. 

हे ही वाचा: sscresult.mahahsscboard.in, MSBSHSE SSC Result 2025: 10वीचा निकाल अखेर जाहीर, राज्याचा किती टक्के निकाल?

CBSE परीक्षेत पास होण्यासाठी किती टक्के आवश्यक?

CBSE बोर्डाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 33 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहेत. दहावीसाठी, हे गुण एकत्रित ( Theory आणि अंतर्गत मूल्यांकन ) आधारावर विचारात घेतले जातात, तर बारावीमध्ये, विद्यार्थ्यांना थ्योरी आणि प्रॅक्टिक्लसमध्ये दोन्हीमध्ये स्वतंत्रपणे किमान 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. जर एखादा विद्यार्थी परीक्षेत खूप कमी फरकाने (जसे की 1 गुण) उत्तीर्ण झाला नाही, तर बोर्ड त्याला/तिला ग्रेस मार्क म्हणजेच अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेऊ शकते.

हे ही वाचा: sscresult.mahahsscboard.in, MSBSHSE SSC Result 2025: दहावीचा निकाल जाहीर, 'या' 7 वेबसाईटवर झटपट पाहा तुमचा निकाल

Relative Grading नुसार मिळतील गुण

यावेळी बोर्डाने 'Relative Grading' हा एक नवीन ग्रेडिंग पॅटर्न लागू केला आहे. ही जुन्या निश्चित ग्रेडिंग पॅटर्नपेक्षा वेगळी आहे. पूर्वी, विद्यार्थ्यांना निश्चित गुणांच्या श्रेणीवर आधारित ग्रेड मिळत असत (उदा. 91–100 = A1), परंतु आता विद्यार्थ्यांचे ग्रेड त्यांच्या वर्गमित्रांच्या सरासरी वर्तणूक आणि यश यावर आधारित ठरवले जातील. विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक दबाव कमी करणे आणि स्पर्धेचे संतुलन राखणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

    follow whatsapp