Govt Job: आयटी (IT) क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड कडून आयटी प्रोफेशनल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 'असिस्टंट मॅनेजर'ची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार www.lichousing.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 डिसेंबर रोजी सुरू झाली असून उमेदवार 28 डिसेंबर 2025 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
'एलआयसी हाऊसिंग फायनान्स' ही भारतातील एक आघाडीची गृहनिर्माण वित्त कंपनी आहे, जी एलआयसीची उपकंपनी म्हणून काम करते. या कंपनीत आयटी प्रोफेशनल पदांसाठी भरती केली जात आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई (BE)-आईटी (IT)/सीएस (CS), बीटेक (B.Tech)-आईटी (IT)/सीएस (CS), एमसीए (MCA), एमटेक (M.Tech) किंवा कंप्यूटर सायन्स (CS)/ आयटी (IT) मध्ये किमान 60 टक्के गुणांसह डिग्री असणं आवश्यक आहे. यामध्ये डिस्टन्स लर्निंग, पार्ट-टाइम आणि करस्पॉन्डंट पदवी वैध राहणार नाहीत.
हे ही वाचा: "तुझं लग्न होऊ देणार नाही.." दाजीने मेहुणीला पाठवले अश्लील मॅसेज अन् विरोध केल्यास 'ती' धमकी!
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं वय किमान 28 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असणं गरजेचं आहे. 1 डिसेंबर 2025 तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. याशिवाय, पदावर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांकडे आयटी सर्व्हिसशी संबंधित फील्डमध्ये किमान 5 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे.
वेतन: 16.50 लाख रुपये ते 19.15 लाख रुपये (वार्षिक)
हे ही वाचा: "बायकोने माझे अश्लील फोटो व्हायरल केले..." पतीने आपल्याच पत्नीविरुद्ध दाखल केली तक्रार! नेमकं प्रकरण काय?
कसा कराल अर्ज?
1. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम www.lichousing.com या एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. त्यानंतर, होमपेजवरील 'Job Opportunities' सेक्शनमध्ये जाऊन 'Recruitment for IT Professional' च्या टॅबवर क्लिक करा.
3. आता, खालील Notification for the post of full stack developer समोर 'Apply Online' लिंकवर जा.
4. आता सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरून घ्या.
5. नंतर, पासपोर्ट साइज फोटो, रिज्यूम आणि मागितलेले इतर डॉक्यूमेंट्स अपलोड करा.
6. शेवटी, फॉर्म तपासून तो सबमिट करा.
भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार 'एलआईसी हाउसिंग फाइनेंस लिमिटेड'च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
ADVERTISEMENT











