21 वर्षाच्या पोरीची कमालच, भारतीय संघाची रणरागिणी.. ऐनवेळी गेमच फिरवणारी शेफाली आहे तरी कोण?

Who is Shafali Verma: भारतीय महिला क्रिकेट संघाची ओपनर आणि फिरकीपटू शेफाली वर्मा हिने तिच्या अष्टपैलू कामगिरी भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून दिली आहे. जाणून घ्या कोण आहे शेफाली वर्मा.

who is shafali verma who led indian womens cricket team to victory in world cup final

शेफाली वर्मा (Photo: AFP/Getty Images)

रोहित गोळे

03 Nov 2025 (अपडेटेड: 03 Nov 2025, 02:13 AM)

follow google news

नवी मुंबई: महिला विश्वचषक 2025 मध्ये भारतीय संघाने द. आफ्रिकेला पराभूत करत पहिल्यांदाच विश्वचषक पटकावला. पण या अंतिम सामन्यात ऐनवेळी संघात आलेल्या शेफाली वर्माने अशी चमकदार कामगिरी केली की, ज्यामुळे केवळ सामनाच नाही तर थेट विश्वचषकालाच गवसणी घातली. सेमीफायनल सामन्याआधी प्रतिका रावल ही दुखापतग्रस्त झाल्याने शेफाली वर्माला संघात स्थान देण्यात आलं. 

हे वाचलं का?

विश्वचषक स्पर्धेत अवघे 2 सामने खेळायला मिळालेले असतानाही शेफालीने केवळ आपल्या फलंदाजीनेच नाही तर गोलंदाजीने देखील भारतीय संघाला विजय मिळवून दिला. जाणून घेऊया कोण आहे शेफाली वर्मा.

शेफाली वर्मा ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक प्रमुख ओपनर बॅट्समन असून, तिची आक्रमक खेळी आणि धैर्य भारतीय क्रिकेटला नवे वळण देणारी आहे. 2025 च्या आयसीसी महिला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाने 52 धावांनी विजय मिळवून पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला, आणि या विजयात शेफालीने अत्यंत मोलाची कामगिरी केली. तिने फक्त बॅटिंगनेच नव्हे, तर बोलिंगनेही संघाला मजबूत आधार दिला. 

प्रारंभिक जीवन आणि संघर्ष

शेफाली वर्मा यांचा जन्म 28 जानेवारी 2004 रोजी हरियाणातील रोहतक येथे झाला. तिचे वडील संजीव वर्मा हे क्रिकेटप्रेमी असून, ते छोट्या ज्वेलरी शॉपचे मालक आहेत. आईचे नाव प्रवीण बाला आहे. शेफालीला एक मोठा भाऊ साहिल (लेग स्पिनर) आणि एक छोटी बहीण नॅन्सी आहे. संपूर्ण कुटुंब क्रिकेटशी जोडलेले आहे. वडिलांच्या आग्रहाने शेफालीने 8 व्या वर्षी क्रिकेट सुरू केले, पण रोहतकमधील अकादमी मुलींना प्रवेश देण्यास तयार नव्हतं. त्यामुळे तिने मुलाच्या वेशात (केस छोटे करून) श्री राम नारायण क्रिकेट अकॅडमीत प्रवेश घेतला. नंतर तिने स्वतंत्रपणे सराव केला आणि लहान वयातच U-12 स्पर्धेत भाऊ आजारी पडल्यावर त्याच्या जागी खेळली. हा संघर्ष तिच्या धैर्याची साक्ष देतो.

हे ही वाचा>> विश्वविजेत्या भारतीय महिला संघाचं 'मुंबई कनेक्शन', शांतीत क्रांती करणारा कोच.. कोण आहे अमोल मुजुमदार?

2025 विश्वचषक अंतिम सामन्यातील मोलाची कामगिरी

2025 च्या आयसीसी महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामना 2 नोव्हेंबरला नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर झाला. द. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करून भारतीय संघाला पहिल्यांदा बॅटिंगसाठी पाचारण केलं. यावेळी भारतीय संघाने 50 षटकांत 7 विकेट्स गमावून 298 धावा केल्या. शेफालीला अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले कारण प्रतीका रावल दुखापतग्रस्त झाली होती. यामुळे टीम स्क्वॉडमध्ये नसताना ऐनवेळी शेफालीची संघात "वाइल्ड कार्ड एंट्री" झाली. ज्याचं तिने अक्षरश: सोनं केलं.

हे ही वाचा>> ICC Women 2025 world cup: पोरींनी जग जिंकलं! भारताच्या महिलांनी रचला इतिहास, पटकावला पहिलावहिला विश्वचषक!

  • बॅटिंग: शेफालीने ओपनिंग करताना स्मृती मंधनासोबत 104 धावांची खणखणीत भागीदारी केली. यावेळी शेफालीने तिने 78 चेंडूंत झटपट 87 धावा केल्या (7 चौकार, 2 षटकार). हे तिची ३ वर्षांनंतरची पहिलं ODI अर्धशतक आहे. तसंच करिअरमधील सर्वोत्तम धावसंख्या. तिच्या या धडाकेबाज खेळीमुळे भारताने 298 धावांपर्यंत मजल मारली. ज्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावांवरच सर्वबाद झाला.
  • बोलिंग: अंतिम सामन्यात द. आफ्रिकेची कर्णधार वूल्फोर्ट हिने सूने लूससोबत चांगली भागिदारी केली होती. या दोघीही खेळपट्टीवर सेट झाल्या होत्या. भारतीय संघाच्या कोणत्याही प्रमुख गोलंदाजाला त्यांना बाद करता येत नव्हतं. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौर हिने अचानक पार्ट-टाइम गोलंदाज शेफाली वर्माकडे चेंडू सोपावला. 

याही संधीचं सोनं करत शेफालीने तिच्या पहिल्याच ओव्हरमध्ये सूने लूस हिला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. त्यानंतर आपल्या पुढच्याच ओव्हरमध्ये शेफालीने नव्यानेच आलेल्या मारिझाने काप हिला अवघ्या 4 धावांवर बाद केलं. त्यामुळे द. आफ्रिकेच्या बाजूने झुकलेला हा सामना शेफालीने पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवाल. 

कारण ऐन मोक्याच्या क्षणी अत्यंत महत्त्वाच्या दोन विकेट घेऊन शेफालीने भारतीय संघाला सामन्यात कायम ठेवलं. लागोपाठ दोन विकेट गेल्याने द. आफ्रिकेचा संघ हा दबावात आला. ज्यानंतर त्यांना सामन्यात पुनरागमन करताच आलं नाही आणि भारताने थेट विश्वचषकाला गवसणी घातली.

शेफालीची हीच ऑलराऊंड कामगिरी ऐतिहासिक आहे. कारण ती ODI वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्धशतक झळकावून, 2 विकेट्सही घेणारी पहिली क्रिकेटर ठरली आहे.

शेफालीची क्रिकेट कारकीर्द

शेफालीने 2019 मध्ये, केवळ 15 वर्षांच्या वयात, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सूरत येथे T20I डेब्यू करून भारतातील सर्वात तरुण महिला क्रिकेटर म्हणून नाव कमावलं. IPL 2019 च्या प्रदर्शनी सामन्यात तिच्या आक्रमक खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. 2021 मध्ये तिने इंग्लंडविरुद्ध टेस्ट डेब्यू करून सर्व फॉरमॅट्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात तरुण खेळाडू (पुरुष किंवा महिला) बनली. 

काही प्रमुख रेकॉर्ड्स:

T20I मध्ये: 8 ऑक्टोबर 2022 रोजी 1000 धावा पूर्ण करणारी सर्वात तरुण क्रिकेटर.

ODI मध्ये: 2019 मध्ये डेब्यू, आक्रमक ओपनिंग स्टाइलसाठी ओळखली जाते.

देशांतर्गत क्रिकेट आणि IPL: शेफाली ही हरियाणा संघासाठी खेळते.  WPL 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने तिला 2 कोटी रुपयांत विकत घेतले. WPL मध्ये ती संघातील दुसरी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे (स्ट्राईक रेट 130 च्या जवळपास).

शेफाली ऑफ-साईडवर जबरदस्त शॉट्स खेळते आणि दबावातही शांत राहते. 

शेफालीचे भविष्य

21 वर्षांच्या वयात शेफालीने आधीच इतिहास रचला आहे. तिची आक्रमकता आणि दबावात खेळण्याची क्षमता तिला स्मृती मंधनाची योग्य जोडीदार बनवते. WPL 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी तिची कामगिरी पाहण्यास उत्सुकता आहे. तिच्या संघर्षगाथेने अनेक मुलींना क्रिकेटकडे प्रेरित केले आहे. विश्वचषक विजयाने तिचे नाव कायमस्वरूपी कोरले गेले!

    follow whatsapp