Crime News: आपल्या साथीदाराला धोका देवून दुसऱ्याकोणासोबत अनैतिक संबंध ठेवल्यामुळे बऱ्याच धक्कादायक घटना घडल्याच्या बातम्या पाहायला मिळतात. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अशीच घटना घडल्याचं समोर आली आहे. खरंतर, या व्यक्तीच्या पत्नीचे त्याच्या घरमालकासोबत संबंध होते. पतीला त्या दोघांच्या अनैतिक संबंधांबद्दल कळताच त्याला मोठा धक्का बसला. त्याने आपल्या पत्नीला या सगळ्या प्रकरणाबद्दल विरोध केला असता त्याच्या पत्नीनेच त्याला धमकवायला सुरूवात केली. त्यावेळी पत्नी आपल्या पतीला म्हणाली, "जे काही होतंय ते गुपचूप बघत राहा, जर तोंड उघडलंस तर 36 तुकडे करीन तुमचे...".
ADVERTISEMENT
तुकडे करून मारून टाकण्याची धमकी
मुस्कान आणि सोनम रघुवंशी प्रकरणाने देश आधीच हादरला आहे. या प्रकरणामुळे आता नवऱ्यांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली आहे. जर त्यांच्या पत्नीनेही मुस्कान आणि सोनमप्रमाणे त्यांना मारले तर?, या घटनेतील पतीला सुद्धा अशीच भिती वाटली. त्यावेळी त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांची मदत मागितली. तो पोलिसांनी म्हणाला, "साहेब, सोनम आणि मुस्कानप्रमाणे माझी बायको मला मारून टाकेल. ती माझे तुकडे करून मला मारण्याची धमकी देते. कृपया मला मदत करा."
हे ही वाचा: रीलसाठी व्हिडीओ काढणं जीवावर बेतलं! स्टंट करताना कार 300 फूट दरीत....
घरमालकासोबत संबंध बनवताना रंगेहाथ...
प्रकरणातील पीडित पतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सगळं सांगितलं. आपल्या पत्नी आणि मुलासोबत इंदौरमध्ये भाड्याच्या राहत असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पती हा कामासाठी बाहेर असतो आणि घर चालवतो. पती नेहमी बाहेर असल्यामुळे त्या दरम्यान आरोपी पत्नीचे त्यांच्या घरमालकासोबत संबंध बनले. पीडित पतीला तिच्या पत्नीच्या अनैतिक संबंधांबद्दल आधीच शंका आली होती. एके दिवशी त्याने आपल्या पत्नीला घरमालकासोबत संबंध बनवताना रंगेहाथ पकडले. त्यावेळी पतीने आरोपी पत्नीला जाब विचारला. तो आपल्या पत्नीला म्हणाला, " तुझा नवरा आणि एक मुलगा सुद्धा आहे. तरीसुद्धा तू असं कसं करू शकतेस? तुला हे करताना लाज वाटली नाही का?"
हे ही वाचा: वहिनी-भावजयीला लागलेली अनैतिक संबंधाची सवय, पती कामाला जाताच दोघी जावा तरूणांना आणायच्या घरी; अन्…
पतीलाच दिली मारून टाकण्याची धमकी...
पतीने जाब विचारला असता पत्नीला राग असल्याचं तक्रारदाराने सांगितलं. त्यावेळी पत्नीने पतीलाच धमकी दिली. ती पतीला म्हणाली, "मुस्कान आणि सोनम रघुवंशी लक्षात आहेत ना? जे काही घडतंय ते गूपचुप बघत राहा. नाहीतर मी तुझे 36 तुकडे करेन आणि एका निळ्या ड्रममध्ये टाकेन. कोणालाही कळणारही नाही." आरोपी पत्नी आपल्या मुलाला सुद्धा सतत धमकावत असल्याचं पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितलं. तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे, पती आणि मुलाला आरोपीचा महिलेचा खूप त्रास होतो. ती आपल्यावर हल्ला करू नये म्हणून आपण नेहमीच घरातच कोंडून राहत असल्याचं पीडित व्यक्तीने सांगितलं. त्यावेळी तो पोलिसांना म्हणाला, "मी रात्री घरातून चोरून बाहेर पडतो. एकतर मला पोलीस सुरक्षा द्या किंवा माझ्या पत्नीपासून सुटका करून घ्या." या केसची सोशल माडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
