महिलेच्या पापण्यांमध्ये 250 जिवंत उवा अन् त्यांनी अंडीही घातली; डॉक्टरांकडून मोठी शस्त्रक्रिया, पण आजार कोणता?

Woman had 250 live lice in her eyelids : महिलेच्या पापण्यांमध्ये 250 जिवंत उवा अन् 80 अंडी, डॉक्टरांकडून मोठी शस्त्रक्रिया, पण आजार आहे तरी कोणता?

Woman had 250 live lice in her eyelids

Woman had 250 live lice in her eyelids

मुंबई तक

14 Nov 2025 (अपडेटेड: 14 Nov 2025, 05:27 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेच्या पापण्यांमध्ये 250 जिवंत उवा अन् 80 अंडी

point

डॉक्टरांकडून मोठी शस्त्रक्रिया, पण आजार आहे तरी कोणता?

Woman had 250 live lice in her eyelids : गुजरातमधून एका महिलेला डोळ्याचा गंभीर आजार झालाय. तिच्या डोळ्यात 250 जिवंत उवा असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे डॉक्टरांना मोठी शस्त्रक्रिया देखील करावी लागली आहे. मात्र, डोळ्यात उवा होण्याचा आजार नेमका काय आहे? याबाबत जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

डोळ्यात 250 उवा अन् त्यांनी अंडीही घातली, डॉक्टरांकडून मोठी शस्त्रक्रिया 

अधिकची माहिती अशी की, गुजरातमधील 66 वर्षीय गीता बेन्ना गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून डोळ्यात होत असलेल्या वेदनांमुळे मेटाकुटीला आल्या होत्या. शिवाय त्यांच्या डोळ्यात खाज देखील येत होते. त्यानंतर डोळ्याचा त्रास सहन होत नसल्याने त्यांनी नेत्ररोग तज्ज्ञांकडे धाव घेतली.डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या डोळ्यात 250 उवा आढळल्या आहेत. हा प्रकार अतिशय दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

हेही वाचा : रायगड : 23 वर्षीय तरुणीला तपासण्यासाठी बेडवर झोपायला सांगितलं, अन् 75 वर्षीय डॉक्टरने...

महिलेला झालेला आजार आहे तरी काय? 

महिलेवर उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, "पापणीवर खाज येण्यामागे साधारणपणे कोंडा किंवा किरकोळ इन्फेक्शन कारणीभूत असतं. मात्र पापणीवर उवा आढळणं अत्यंत क्वचितच पाहायला मिळतं. आम्ही नीट निरीक्षण केल्यावर पापणीवर लहान उवा हालचाल करताना दिसल्या. त्या वेळेस उवांनी घातलेली बारीक, गोल आकाराची अंडीही स्पष्टपणे दिसून आली. हा एक वेगळा प्रकारचा परजीवी असून, वैद्यकीय भाषेत या अवस्थेला ‘फ्थिरायसिस पॅल्पेब्ररम’ असं संबोधलं जातं. डोळ्यात उवा आहेत हे ऐकून रुग्ण घाबरू नये, हे आमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं. म्हणून आम्ही प्रथम त्यांना शांत केलं आणि समजावून सांगितलं की उवांची संख्या तुलनेने जास्त असल्यामुळे उपचार प्रक्रियेला थोडा अधिक वेळ लागू शकतो."

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेतील नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या माहितीप्रमाणे, ‘फ्थिरायसिस पॅल्पेब्ररम’ ही अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय स्थिती मानली जाते. या अवस्थेत फ्थिरस प्यूबिस नावाच्या उवा डोळ्यांच्या पापण्यांवर संसर्ग करतात. हा परजीवी प्रादुर्भाव प्रामुख्याने संक्रमित वस्तू किंवा साहित्याच्या संपर्कातून होतो. यामध्ये तीव्र खाज सुटणे, पापण्यांवर लालसरपणा येणे आणि नीट झोप न लागणे अशी लक्षणे दिसून येतात. साधारण डोळ्यांच्या संसर्गासारखा हा त्रास नसल्यामुळे त्याचा शोध लावणे काहीसे कठीण ठरते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पोटच्या लेकराला आईने जळत्या चुलीत फेकलं, नंतर साडीने गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणाले, तिचा पती...

    follow whatsapp