Crime News: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक अल्पवयीन प्रियकर आणि महिलेच्या अनोख्या प्रेमसंबंधाची चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतंय. येथे एका 28 वर्षीय महिलेचं तिच्याहून 11 वर्षे लहान मुलावर प्रेम जडलं. त्यानंतर, संबंधित महिलेनं अल्पवयीन तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि नंतर त्याला घेऊन पळून गेली. अल्पवयीन मुलाच्या कुटुंबियांनी संबंधित महिलेवर मुलाचं अपहरण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला. आता दोन महिन्यांनंतर अल्पवयीन मुलगा प्रौढ झाल्यानंतर तो त्याच्या घरी परतला.
ADVERTISEMENT
एकाच दुकानात काम करायचे
खरंतर, नारियालखेडा येथील रहिवासी किशोर एका सोनाराच्या दुकानात काम करायचा. तसेच, द्वारका नगर येथील एक महिला त्याच दुकानात कंप्यूटर ऑपरेटर होती. एकाच दुकानात दोघेही एकत्र काम करत असताना दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर दोघांचं एकमेकांसोबत प्रेम जडलं. 30 जून रोजी आपण माधवी (बदललेलं नाव) च्या घरी जात असल्याचं किशोरने त्याच्या आईला सांगितलं.
किशोरचं अपहरण केल्याचा आरोप
यानंतर किशोरचा फोन बंद झाला. त्याच्याशी संपर्क न झाल्यामुळे किशोरच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे त्याच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती देखील बेपत्ता होती. 3 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलगा प्रौढ झाला आणि रक्षाबंधनाच्या दिवशी तो त्याच्या घरी परतला. तो स्वतःच्या मर्जीने इंदौरमध्ये त्या महिलेसोबत राहत असल्याचं किशोरने पोलिसांना सांगितलं.
हे ही वाचा: प्रियकरासाठी पतीला सोडलं अन् त्याच्याकडूनच मिळाला धोका... पीडितेनं घेतला ‘तो’ निर्णय अन् पुढे...
महिला सुद्धा मुलाच्या घरातंच राहू लागली...
किशोर त्याच्या घरी पोहचल्यानंतर दोन दिवसांनी संबंधित महिला सुद्धा किशोरच्या घरी पोहोचली आणि तिथेच राहू लागली. महिलेने मुलाच्या कुटुंबाला सांगितले की “मी किशोरवर प्रेम करते आणि आम्ही दोघं एकत्रच राहू. तीन वर्षांनी, सर्व काही ठीक झाल्यानंतर मी किशोरशी लग्न करेन.” संबंधित महिलेविरुद्ध अल्पवयीन मुलाचं अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आता संबंधित तरुण प्रौढ असल्याने कायदेशीर कारवाई रद्द करण्यात आली आहे.
हे ही वाचा: पत्नीला दुसऱ्याच पुरुषाच्या शरीराचं आकर्षण! मग झाली मांत्रिकाची एन्ट्री अन् सगळा खेळच...
पोलिसांनी दिली माहिती
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर वैद्यकीय तपासणीसाठी तयार नाही. तसेच, आईने सुद्धा संबंधित महिलेला घरात राहण्याची परवानगी दिली आहे. किशोरची आई यावर म्हणाली, “ती आमची सून होईल. पण 3 वर्षांनी.” मात्र, नुकतंच किशोरीच्या बहिणीला मारहाण केल्याच्या प्रकरणात महिलेला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.”
ADVERTISEMENT
