कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, रायगडला पावसाचा रेड अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) 16 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाबाबत महत्त्वपूर्ण अंदाज जारी केला आहे.

Maharashtra Weather Today (फोटो- Grok AI)

Maharashtra Weather Today (फोटो- Grok AI)

मुंबई तक

• 06:33 AM • 16 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

16 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाबाबत महत्त्वपूर्ण अंदाज

point

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) 16 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाबाबत महत्त्वपूर्ण अंदाज जाहीर केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने आणि ला निना परिस्थितीमुळे राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. यापैकी कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील पावसाच्या ऐकून अंदाजाबाबत माहिती जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे हादरलं! तरुणाने महिलेशी ठेवले अनैंतिक संबंध, लेकाच्या तळपायाची आग मस्तकात, भररस्त्याच कोयत्याने सपासप वार, नेमकं काय घडलं?

कोकण विभागात पावसाची कशी परिस्थिती?

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. तसेच समुद्रकिनारी दक्षता घेण्याचे स्थानिक प्रशासन आवाहन करत आहे. तसेच यापैकी रत्नागिरीत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट, तर सिंधुदुर्गात येलो अलर्ट जारी करण्यात आल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय.

पश्चिम महाराष्ट्रातील हवामान :

पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे शहरात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी रिमझिम पाऊस अपेक्षित आहे, ज्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात पावसाचा हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मराठवाडा आणि विदर्भ : 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया येथे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे अपेक्षित आहेत. तसेच जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगरात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, भंडारा गोंदिया, गडचिरोली येथे पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

हे ही वाचा : मुंबई शहर आणि उपनगराला मुसळधार पाऊस झोडपणार! सांताक्रूझ, कुलाबासह 'या' ठिकाणी धो धो बरसणार..कसं आहे आजचं हवामान?

उत्तर महाराष्ट्र :

नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. नाशिक, नाशिक घाटमाथा, धुळे, नंदुरबार, जळगाव येथे हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

 

    follow whatsapp