Crime News: उत्तर प्रदेशातील फतेहपुर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आशा वर्कर म्हणून काम करणारी एक महिला आपला पती आणि तीन मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली आहे. पतीने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एका तरुणासोबत पत्नीची ओळख झाली होती. 3 जुलैपासून महिला घरातून गायब असल्याची माहिती पतीने दिली. कोणत्याही तरी मीटिंगला जाते, असं सांगून ती घरातून पळून गेली.
ADVERTISEMENT
खरंतर ती महिला फोनवर कोणाशी तरी खूप गप्पा मारायची. त्या महिलेचा प्रियकर असून ती त्याच्यासोबत पळून गेली असल्याचं सांगितलं जातं. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी महिलेचं लोकेशन ट्रेस केलं असता ते गुवाहाटीमध्ये असल्याचं आढळून आलं आहे.
हे ही वाचा: 20 वर्ष लहान तरुणाला पाहून 2 मुलांच्या आईची नियत फिरली, अनैतिक संबंधानंतर थेट...
2011 मध्ये झालं लग्न
जिल्ह्यातील गाझीपूर पोलीस स्टेशन परिसरातील चाकसकरण येथील रहिवासी मनोज कुमार उर्फ चेतराम यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना तक्रार पत्र लिहिले. त्यात त्यांनी सांगितले की त्यांचं लग्न 7 जून 2011 रोजी सविता देवीशी झालं होतं. लग्नानंतर त्यांना 3 मुले झाली. 3 जुलै रोजी त्यांची पत्नी सविता देवी पीएचसी बहुआ येथे एका मीटिंगला जाण्यासाठी घराबाहेर पडली. त्याच दिवशी तिने बँकेतून 500 रुपये सुद्धा काढले होते. मीटिंगला जाण्यासाठी म्हणून ती बाहेर पडली आणि तेव्हापासून ती गायब आहे.
हे ही वाचा: आरारारारा खतरनाक! पठ्ठ्याने दारूच्या नशेत जिवंत सापाला खाल्लं..नंतर घडली सर्वात भयंकर घटना
गुवाहाटी लोकेशन
पीडितेच्या पतीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या पत्नीचा खूप शोध घेतला. पण ती कुठेच सापडली नाही. मग त्यांनी आपली पत्नी बेपत्ता असल्याची गाजीपूर पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांच्या मते, सविता देवीचं लोकेशन ट्रेस केल्यानंतर ती गुवाहाटीमध्ये असल्याचं दिसून येत आहे. पीडितेच्या पतीच्या मते, पोलिसांनी त्यांच्या पत्नीचा लवकरात लवकर शोध घ्यावा.
ADVERTISEMENT
